४ सप्टेंबरला सुरू झालेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीचं पसंतीस उतरली आहे. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, अपूर्वा नेमळेकर, शुभांगी गोखले अशी तगडी कलाकार मंडळी असलेल्या या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. मुक्ता, सागर, सई अशी अनेक पात्र असलेली ही मालिका सध्या टीआरपीच्या शर्यतीतही पुढे आहे. अशात मालिकेत लवकरच नवं वळणं येणार आहे.

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीच्या आई-वडिलांचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण: झळकणार ‘या’ चित्रपटात

सध्या ‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका एक वेगळ्या वळणावर आहे. सागर व सावनीचा घटस्फोट न्यायालयाने मंजूर केला असला तरी सईची कस्टडी कोणाला मिळणार? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. काही दिवसांपूर्वी सईने कालबाह्य झालेलं कप सिरप प्यायल्यामुळे सुरू झालेलं नाट्य आता तिच्या कस्टडीपर्यंत येऊन पोहोचलं आहे. सागर लेकीची कस्टडी मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

दुसऱ्याबाजूला हर्षवर्धन व सावनी पहिल्या मुलाप्रमाणे सईला सुद्धा हॉस्टेलमध्ये टाकण्याची तयारी करत आहे. याचवेळी मुक्ता हर्षवर्धन व सावनीच्या घरी असते आणि यामुळे दोघांचा खरा चेहरा तिच्यासमोर येतो. मुक्ताला हे पाहून खूप पश्चाताप होतो. यानंतर आता मुक्ता शक्कल लढवून सागरची मदत करताना दिसणार आहे. यामुळे मुक्ता व सागरमधील मैत्रीच्या नात्याची सुरुवात होणार आहे. याचा प्रोमो नुकताच ‘स्टार प्रवाह’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये मुक्ता व सागरमध्ये नेहमीप्रमाणे वाद होताना दिसत आहे.

हेही वाचा – ‘माझा होशील ना’नंतर विराजस कुलकर्णी व गौतमी देशपांडे पुन्हा झळकणार एकत्र; निमित्त मालिका नव्हे तर….

हेही वाचा – “…म्हणून मी ‘अबोली’ मालिका स्वीकारली” अभिनेता सुयश टिळकने सांगितलं कारण, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेच्या नव्या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. ‘अप्रतिम मालिका’, ‘मालिका खूप छान आहे. मला खूप आवडते’, ‘स्टार प्रवाहचा टीआरपी वाढणार आहे’, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत.