Muramba fame Shivani Mundhekar: अभिनेत्री शिवानी मुंढेकर ही ‘मुरांबा’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. रमा या भूमिकेतून तिने सर्वांची मने जिंकली आहेत. रमा या पात्राच्या वेगवेगळ्या छटा तिने उत्तमपणे तिच्या अभिनयातून प्रेक्षकांसमोर आणल्याचे दिसते.

अभिनेत्रीला या भूमिकेतून मोठी लोकप्रियता मिळाली. शिवानीबरोबरच मालिकेत अभिनेता शशांक केतकर प्रमुख भूमिकेत दिसत आहे. त्याने अक्षय ही भूमिका साकारली आहे. मालिकेतील रमा-अक्षयच्या जोडीला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळताना दिसत आहे. आता मात्र रमा म्हणजेच शिवानी तिच्या भूमिकेमुळे नाही तर तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे.

शिवानी मुंढेकरचा बिपाशा बासूच्या ‘नमक’ गाण्यावर डान्स

शिवानीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने नमक या गाण्यावर सादरीकरण केले आहे. तिच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना तिने कॅप्शन लिहिली आहे. तिने असे लिहिले की, मला हे खूप दिवसांपासून करायचे होते, पण धाडस केले नाही. हा डान्स किंवा सादरीकरण परफेक्ट आहे असे नाही; तर हा व्हिडीओ हावभावाबद्दल आहे.

नेटकरी काय म्हणाले?

शिवानीच्या या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट्स करत तिचे कौतुक केले आहे. अभिनेत्री रेवती लेले, तसेच गिरीजा प्रभू यांनी कमेंट करत तिचे कौतुक केले आहे; तर चाहत्यांनी लिहिले, “अरे वाह! शिवानी खूप छान”, “खूप सुंदर”, “भारी”, “नादखुळा”, “खूप छान केले आहेस”, “मस्त”, “क्यूट”, “खूप सुंदर परफॉर्मन्स”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत. तर अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत तिचे कौतुक केले आहे.

अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा ती तिचे फोटो शेअर करत असते, तर काहीवेळा सेटवरील व्हिडीओदेखील शेअर करते, त्यालादेखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळताना दिसतो.

‘मुरांबा’ मालिकेबाबत बोलायचे तर सध्या मालिकेत ट्विस्ट आलेले पाहायला मिळते. रमा व अक्षयला एक मुलगी आहे. गेली सात वर्षे रमा तिच्या घरापासून दूर होती. मात्र, आता आरोहीमुळे रमा व अक्षय़ एकत्र येणार का? इरावतीचे कारस्थान सर्वांसमोर येणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.