‘नागिन’ फेम लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री सुरभी ज्योती लवकरच तिचा प्रियकर सुमित सूरीबरोबर विवाहबंधनात अडकणार आहे. २०२४ च्या सुरुवातीपासूनच या जोडप्याच्या लग्नाच्या चर्चा सुरु होत्या. सुरभी आणि सुमितने सुरुवातीला मार्च महिन्यात लग्न करण्याचे ठरवले होते, परंतु ठरलेल्या ठिकाणाचे बुकिंग न मिळाल्याने त्यांनी लग्न ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलले गेले. आता २७ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांचा लग्नसोहळा पार पडेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.

सुरभी आणि सुमित सध्या यांच्या लग्नाआधीच्या विधी सुरू आहेत. सुरभीने त्यांच्या प्री-वेडिंग कार्यक्रमातील सुंदर फोटो शेअर केले, ज्यात हे जोडपे पिवळ्या पारंपरिक पोशाखात नटलेले दिसत आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आणि दिव्यांच्या उजेडात त्यांनी हा नवा जीवनप्रवास आनंदाने आणि उत्साहाने स्वीकारला आहे. सुरभीने या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “या नात्याच्या मुळात उष्णता आणि पावसाची कहाणी, सहनशीलता आणि स्नेह सामावलेला आहे. सुमित आणि मी आमच्या प्रवासाची सुरुवात निसर्गाच्या पवित्र सान्निध्यात केली आहे, जिथे विशाल झाडे आणि जीवनाला आधार देणारे पाच तत्व साक्षी आहेत.”

हेही वाचा…आर्या जाधवचा फोन आल्यावर सूरज चव्हाण म्हणाला, “कोण पाहिजे?” रॅपरने माफी मागितली अन्…, पाहा Video

या पोस्टनंतर लगेचच सेलिब्रिटी, मित्र आणि चाहत्यांकडून सुरभी आणि सुमितवर शुभेच्छांचा वर्षाव झाला. अभिनेत्री आश्का गोराडियाने लिहिले, “अभिनंदन! तुम्ही अप्रतिम दिसत आहात.” सुरभी चंदनाने म्हटले, “खूप खूप शुभेच्छा!” आर्टी सिंगने देखील आनंद व्यक्त करत, “अभिनंदन! तुम्हा दोघांना संपूर्ण सुख लाभो,” असे लिहिले. निया शर्माने कमेंट करत लिहिलं, “सर्वात सुंदर वधू, सुरभी ज्योती! खूप सारं प्रेम!”

हेही वाचा…Bigg Boss 18 मध्ये मोठा ट्विस्ट! डबल एव्हिक्शनमध्ये ‘हे’ दोन सदस्य घराबाहेर, सलमान खान घेणार अविनाश मिश्राची शाळा

सुरभी आणि सुमितने त्यांच्या लग्नासाठी उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील एक आलिशान रिसॉर्ट निवडले आहे. या सुंदर निसर्गरम्य ठिकाणी या दोघांचे लग्न होणार आहे. पर्यावरणपूरकता आणि निसर्गाबद्दल आदर राखत या लग्नात विशेष पर्यावरणस्नेही विधी ठेवण्यात आले आहेत. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पाच तत्वांचा आदर करीत, अर्थपूर्ण आणि प्रतीकात्मक पद्धतींनी हा विवाहसोहळा पार पडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सुरभी ज्योती आणि सुमित सूरी यांच्या या नव्या सुरुवातीसाठी चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रेमळ कमेंट्सचा वर्षाव होत आहे.