‘बिग बॉस’ हिंदीचं सध्या १६वं पर्व सुरू आहे. सुरुवातीपासूनच हा कार्यक्रम चर्चेत राहिला आहे. आता या पर्वाचे शेवटचे काही दिवस राहिलेले असतानाच आता हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या शोमधील एका स्पर्धकांनी केलेल्या जातीवाचक टिप्पणीबद्दल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने (National Commission for Scheduled Castes) कार्यक्रमाच्या निर्मात्यांना नोटीस पाठवली आहे.

‘बिग बॉस १६’च्या २८ डिसेंबर रोजी प्रसारित झालेल्या भागात विकास मनकतला आणि अर्चना गौतम यांच्यामध्ये वादावादी मोठी वादवादी झाली. या दरम्यान विकासने अर्चनाला केलेल्या एका आक्षेपार्ह टिप्पणीमुळे ही नोटीस पाठवण्यात आली आहे.

आणखी वाचा : …आणि जिनिलीया देशमुखने मानले सायली संजीवचे हात जोडून आभार, जाणून घ्या नक्की काय झालं

त्या भागात विकासने अर्चनाला खालच्या जातीचे लोक म्हणून संबोधलं. त्याचं हे असं बोलणं एससी/एसटी कायद्यांतर्गत हा दंडनीय गुन्हा आहे, असं आयोगाने म्हटलं. त्यामुळे याची चौकशी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने या कार्यक्रमाच्या निर्मात्यांना तसंच कलर्स टीव्ही, एंडेमोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Endemol India Pvt Ltd), वायाकॉम18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याबरोबरच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव आणि मुंबईच्या पोलिस आयुक्तांना ही नोटीस जारी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Video : एकमेकांच्या अंगावर धावून गेले, हाणामारी झाली अन्…; एमसी स्टॅन-शालिन भानोतमध्ये तुफान राडा, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयोगाने शोच्या निर्मात्यांना आणि कलर्स टीव्हीला या प्रकरणी ७ दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं आहे. यामध्ये घटनेची तारीख, तपशील आणि इतर माहिती देण्यास सांगण्यात आलं आहे. हा अहवाल वेळेवर दिला नाही तर पुढील कारवाई केली जाईल, असंही आयोगाने या नोटीसमध्ये म्हटलं आहे.