‘झी मराठी’ वाहिनीवर काही महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना चांगलं खिळवून ठेवलं आहे. तसंच मालिकेतील कलाकारांनी देखील आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळेच मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. अशातच लीला म्हणजे अभिनेत्री वल्लरी विराजच्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओतील तिच्या सुंदर नृत्याचं व अदाकारीचं कौतुक होतं आहे.

अलीकडे अभिनेत्री वल्लरी विराजने मालिकेतील बहीण रेवती म्हणजे अभिनेत्री आलापिनी अमोल बरोबर सुंदर शास्त्रीय नृत्य केलं होतं. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ वेब सीरिजमधील ‘सैयां हटो जाओ’ या गाण्यावर वल्लरी व आलापिनी शास्त्रीय नृत्य करताना दिसल्या होत्या. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता वल्लरीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Video: “सौ दर्द दिए उसने जो दर्द का मरहम था…”, अजय देवगण व तब्बूच्या नव्या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित

वल्लरीने तिच्या इन्स्टाग्रामवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत वल्लरी ‘हीरामंडी’मधील ‘चौदहवी शब’ गाण्यावर सुंदर नृत्य करत असून त्यावर तिची मनमोहक अदाकारी पाहायला मिळत आहे. तसंच तिचं साडीमध्ये सौंदर्य अजूनच खुललं आहे.

वल्लरीच्या या सुंदर सादरीकरणावर कलाकारांसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “कमाल”, “व्वा वल्लरी”, “खूप सुंदर”, “तुझे एक्सप्रेशन खूपच भारी आहेत”, “लय भारी वल्लरी…म्हणून एजे फिदा आहे”, “खूप छान”, “मूळ गाण्यातील नृत्यापेक्षा तुझं नृत्य छान आहे”, “एकदम मस्त”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी वल्लरीच्या व्हिडीओवर दिल्या आहेत.

हेही वाचा – “हाडा मांसाचे कलाकार घ्या,” मालिकेत AIच्या वापराबद्दल संतापली मराठी अभिनेत्री? म्हणाली, “कलाकार अजून जिवंत…”

दरम्यान, वल्लरीने ‘नवरी मिळेल हिटलरला’ मालिकेपूर्वी बऱ्याच मालिका व चित्रपटात काम केलं आहे. तिने तिच्या अभिनयाचा ठसा हिंदीत उमटवला आहे. काही महिन्यांपूर्वी तिचा ‘कन्नी’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात वल्लरीच्या सोबतीला अभिनेत्री हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत हे कलाकार होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय वल्लरीचा स्वतःचा एक छोटा व्यवसाय आहे; जो प्राण्यांशी संबंधित आहे. वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून आहे. Bath and Barks असं तिच्या सलून नाव आहे. दादरमधील गोखले रोड येथे वल्लरीचं पेट ग्रुमिंग सलून असून बरेच मराठी कलाकार आपल्या प्राण्यांचं ग्रुमिंग करण्यासाठी अभिनेत्रीच्या सलूनमध्ये जातात.