Vallari Viraj and Aalapini Dance: काही मालिका संपल्या तरी त्या मालिकांचा, त्यामध्ये काम करणाऱ्या कलाकारांचा चाहतावर्ग कायम राहतो. या मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘नवरी मिळे हिटलरला’ ही आहे.

‘नवरी मिळे हिटलरला‘ या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र, तरीही यातील कलाकारांची सातत्याने चर्चा होताना दिसते. वल्लरी विराज व राकेश बापट यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. वल्लरीने लीला तर राकेशने एजे या भूमिकांतून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. या मालिकेतील कलाकारांचा ऑनस्क्रीनच नाही तर ऑफस्क्रीन बॉण्डदेखील प्रेक्षकांना आवडला.

मालिकेत लीला व तिची बहीण रेवती यांच्यातील नात्यानेदेखील प्रेक्षकांचे लक्ष वेधले होते. मात्र, खऱ्या आयुष्यातदेखील त्यांच्यात उत्तम नाते असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भूमिकांबरोबरच, वल्लरी व आलापिनीच्या सोशल मीडियावरील रील्सना मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची पसंती मिळते. आता पुन्हा एकदा वल्लरी आणि आलापिनी एका डान्स व्हिडीओच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत.

वल्लरी विराजचा ऑनस्क्रीन बहिणीबरोबर ‘देखो ना’ गाण्यावर डान्स

वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी देखो ना या गाण्यावर डान्स केला आहे. दोघींनी पोशाखही सारखाच केला आहे. पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि स्कर्ट असा हा पोशाख आहे. त्यांचे हावभाव लक्ष वेधून घेत आहेत. वल्लरीने हा व्हिडीओ शेअर करताना ‘आम्ही परत आलो’ अशी कॅप्शन लिहिली आहे. तसेच आलापिनीला टॅग केले आहे.

आता अभिनेत्रींच्या या व्हिडीओवर अभिनेत्री सानिका काशिकरने हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत. सानिका काशिकरदेखील नवरी मिळे हिटलरलामध्ये प्रमुख भूमिकेत होती. तिने लक्ष्मी ही भूमिका साकारली होती. सानिकाबरोबरच चाहत्यांनीदेखील कौतुकाचा वर्षाव केला आहे.

एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्हा दोघींना एकत्र डान्स करताना पाहायला कायमच छान वाटतं”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले, “किती सुंदर गं. आम्हाला तुम्हा दोघींची आणि तुमच्या डान्सची आठवण येते”, आणखी एका नेटकऱ्याने लिहिले, “सुंदरच. तुमच्या दोघींना एकत्र पाहून छान वाटलं. हावभाव खूप मस्त”, एका नेटकऱ्याने लिहिले, “तुम्हा दोघींना आणि तुमच्या एकत्र रील्सची आठवण येत होती”, “मस्त, किती छान वाटता दोघी”, अशा अनेक कमेंट करत चाहत्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आता ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेनंतर हे कलाकार कोणत्या नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची प्रेक्षक प्रतिक्षा करत असल्याचे दिसत आहे.