Vallari Viraj Shares Photo With Raqesh Bapat: एखाद्या मालिकेचा शेवट होणं, हा प्रेक्षकांसाठी जितका भावुक क्षण असतो, तितकाच तो कलाकारांसाठी देखील असतो. आता सोशल मीडियामुळे चाहते तसेच कलाकारांच्या भावना काय आहेत, हे पाहायला मिळते.
झी मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणारी ‘नवरी मिळे हिटलरला’ ही मालिकादेखील लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. आता या मालिकेचे शूटिंगदेखील संपले आहे. मालिकेचे शूटिंग झाल्यानंतर मालिकेतील कलाकारांनी भावुक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याचे पाहायला मिळाले. कलाकारांनी मुलाखतींमध्येदेखील त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसेच प्रेक्षकांच्या प्रेमाप्रति त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
आता अभिनेत्री वल्लरी विराजने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये वल्लरी व राकेश बापट दिसत आहे. दोघेही एजे व लीलाच्या पेहरावात दिसत आहेत. ते दोघेही एका ठिकाणी बसले असून एजेने लीलाच्या खांद्यावर डोके ठेवले आहे. तर लीलाच्या चेहऱ्यावर हसू दिसत आहे. हा फोटो शेअर करताना वल्लरीने शूटिंगचा शेवटचा दिवस असे कॅप्शन दिले आहे. तसेच ‘अभिला’ हा टॅगदेखील लिहिल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
नेटकरी काय म्हणाले?
वल्लरी विराजने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, “एजे-लीला ही आवडती जोडी आहे”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने वल्लरीसाठी लिहिले, “ज्या पद्धतीने तू लीला ही भूमिका साकारली आहेस, ते कौतुकास्पद आहे. तुझ्या पुढच्या कामासाठी तुला शुभेच्छा”, आणखी एका नेटकऱ्याने वल्लरी व राकेशला टॅग करीत लिहिले, “आम्हाला तुमची खूप आठवण येईल. तुम्ही कायमसाठी आमच्या हृदयात जागा निर्माण केली आहे.”




चाहत्यांनी अनेक भावुक कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. “माझी आवडती जोडी आहे.एवढ्या मालिका बघितल्या. पण, ‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत जीव गुंतला होता. नेहमी दोघे आनंदी राहा. तुमच्या पुढच्या प्रवासासाठी शुभेच्छा”, “ही जोडी कायम माझ्या हृदयात राहिल. त्यांची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, “हा प्रवास जरी इथे थांबत असला तरीही तुम्ही आम्हा प्रेक्षकांच्या मनात कायम राहणार आहात. याआधी अनेक जोड्या आल्या आणि यानंतरही अनेक जोड्या येतील. पण, तुमची आमच्या मनातली जागा कोणीच घेऊ शकणार नाही. तुमच्या जोडीने आयुष्यभरासाठी आमच्या मनात घर केले आहे”, “आम्हाला तुमची आठवण येईल”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
एजे व लीला हे दोघेही एकमेकांपेक्षा अगदी वेगळे आहेत. मात्र, ते एकत्र येतात, त्यांच्यात गैरसमज असतात, ते दूर होतात. त्यांच्यात मैत्री होते, ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. कडक शिस्तीचा एजे व गोंधळ घालणारी लीला यांची परफेक्ट जोडी तयार होते. आता ही जोडी लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.