MasterChef India Winner : ‘मास्टरशेफ इंडिया’ या लोकप्रिय कुकिंग शोचा ग्रँड फिनाले शुक्रवारी पार पडला. या शोच्या फिनालेमध्ये सांता सर्मा, महाराष्ट्राच्या सुवर्णा बागुल आणि नयनज्योती सैकिया हे टॉप तीन सदस्य होते. या तिघांपैकी नयनज्योती सैकियाने हा शोचा विजेता ठरला आहे.

“ओम राऊत ड्रग्ज घेतो”; ‘आदिपुरुष’च्या पोस्टरमधील ‘ती’ चूक पाहून संतापले नेटकरी, म्हणाले, “सीता मातेच्या…”

मास्टरशेफ इंडियाच्या ग्रँड फिनालेला अनुभवी शेफ संजीव कपूर यांच्यासह शेफ रणवीर ब्रार, विकास खन्ना आणि गरिमा अरोरा उपस्थित होते. त्यांनी शोच्या तीन फायनलिस्टना “सिग्नेचर थ्री-कोर्स मील” चे चॅलेंज दिले होते. तीन महिन्यांचा प्रवास आणि फायनल कोर्स मीलचे चॅलेंज पूर्ण करून नयनज्योती शोचा विजेता ठरला.

Video: “मी याची खात्री…” घटस्फोटांच्या चर्चांनंतर दीपिकाबद्दल पहिल्यांदाच बोलला रणवीर सिंग

बक्षीस म्हणून काय मिळालं?

नयनज्योतीला बक्षीस म्हणून २५ लाख रुपयांचा चेक, ‘मास्टरशेफ इंडिया’ची प्रतिष्ठित ट्रॉफी तसेच गोल्डन शेफचा कोटही नयनज्योतीला देण्यात आला. आसाममधील सांता सर्मा या दुसऱ्या क्रमांकावर राहिल्या, तर महाराष्ट्रातील सुवर्णा बागुल या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. या दोघींनाही प्रत्येकी पाच लाखांचे चेक व मेडल देण्यात आले.

आधी शिक्षिका नंतर ८ वर्षे मोठ्या मुलीवर प्रेम, विरोधानंतर हाताची नस कापली अन्… अभिनेत्याचा वैयक्तिक आयुष्याबदद्ल खुलासा

नयनज्योती जिंकल्यावर परीक्षकांची प्रतिक्रिया

‘मास्टरशेफ इंडिया’चं विजेतेपद जिंकणं सोपं काम नाही. नयनज्योती सैकिया शो जिंकल्याबद्दल शेफ विकास खन्ना म्हणाले, “मला अजूनही तिनसुकिया येथील भित्रा नयनज्योती आठवतो, ज्याला मी त्याच्या घरी भेटायला गेलो होतो. त्याचं व्हिजन व क्रिएटीव्हीटीच्या माध्यमातून तो अन्नाला कलेमध्ये कसे बदलू शकतो हे पाहून मी खूप प्रभावित झालो. त्याच्या सोशल मीडिया पोस्टने मला प्रभावित केलं आणि त्यावेळी तो या शोसाठी योग्य स्पर्धक असल्याचं मला जाणवलं होतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शो जिंकल्यावर नयनज्योतीची प्रतिक्रिया

“माझं एक साधं स्वप्न होतं आणि ते म्हणजे ‘मास्टरशेफ इंडिया’मध्ये जाऊन स्वयंपाक करायचं, पण आता मला वाटतं की आयुष्यातील माझी सर्व ध्येये पूर्ण झाली आहेत. मी फक्त मास्टरशेफमध्येच गेलो नाही तर मला अॅप्रन देखील मिळाले. एवढी मोठी कुकिंग स्पर्धा जिंकणं मला अशक्य वाटत होतं. माझ्या मनात स्वतःबद्दलच शंका होती, परंतु तिन्ही परीक्षकांनी मला खूप प्रेरित केले, विशेषत: शेफ विकास ज्यांनी ऑडिशनच्या दिवसापासून मला खूप मदत केली आहे.”