scorecardresearch

Premium

Video: नवरा असावा तर असा! ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’तील ‘अधिपती’च्या वागण्यावर भारावले प्रेक्षक, जाणून घ्या कारण

नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला.

hrishikesh shelar

‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेची कथा कलाकारांचा अभिनय आणि या मालिकेत दाखवले जाणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना चांगलेच आवडत आहेत. तर आता अधिपतीवर प्रेक्षक फारच खुश झाले आहेत.

या मालिकेत अक्षरा ही भूमिका शिवानी रांगोळे साकारत आहे तर अधिपतीच्या भूमिकेत ऋषिकेश शेलार दिसत आहे. नुकताच या मालिकेत अक्षरा आणि अधिपती यांचा राजेशाही विवाह सोहळा संपन्न झाला. पण हा विवाह सोहळा झाल्यावर अधिपतीने दाखवलेल्या समजूतदारपणाचं सर्वजण कौतुक करत आहेत.

nanded bjp leader suryakanta patil, suryakanta patil upset due to bjp ashok chavan
भाजपमधील नाराज सूर्यकांता पाटील वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत ?
Uddhav Thackeray
“उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह पुन्हा मिळू शकतं”, SC च्या वकिलांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
Vijay Wadettivars reaction to Ashok Chavan join BJP
चव्हाणांच्या पक्षांतरावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया, म्हणाले “एक व्यक्ती गेला म्हणजे…”
Nana Patole on devendra Fadnavis
“गाडीखाली श्वानाचा मृत्यू झाला तरी राजीनामा मागतील”, फडणवीसांच्या वक्तव्यावर पटोलेंचा संताप; म्हणाले, “लाचारी…”

आणखी वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’मधून ब्रेक घेऊन भुवनेश्वरी गेली अमेरिकेला, मालिकेत करारी भूमिकेत दिसणाऱ्या कविता मेढेकरांचा ग्लॅमरस अंदाज पाहिलात का?

या मालिकेतील एक व्हिडीओ नुकताच वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट केला. यामध्ये अक्षरा-अधिपती यांचं लग्न झाल्यावर अक्षराची पाठवणी होताना दिसत आहे. अक्षरा आणि तिचे कुटुंबीय खूप भावूक झालेले दिसत आहेत. तर त्यांच्या डोळ्यात आलेले अश्रू पाहून अधिपतीही भावूक झालेला दिसत आहे. अक्षराच्या वडिलांची समजूत काढताना अधिपती म्हणतो की, “तुमच्या मुलीचं लग्न झालं असलं तरीही आता तुमच्या कुटुंबात एक नवीन सदस्य सामील झाला आहे. जावई कमी आणि मुलगा जास्त.”

https://fb.watch/nudV0KtQXx/?mibextid=Nif5oz

हेही वाचा : कविता मेढेकरांनी उघड केलं त्यांचं फिटनेस सिक्रेट, म्हणाल्या, “याचं उत्तर एकच आहे की…”

तर आता या व्हिडिओवर कमेंट करत नेटकरी अधिपतीच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. एकाने लिहिलं, “अधिपती एक वाक्य खूप छान बोलला, एक मेम्बर अजून ऍड झालाय तुमच्यात, खरेच असा विचार प्रत्येक जावयाने करावा.” तर दुसऱ्याने लिहिलं, “बायकोच्या डोळ्यात अश्रू पाहून रडणारा तू एकमेव मुलगा.” तर तिसरा नेटकरी म्हणाला, “अधिपती तुझ्यासारखा समजूतदार मुलगा, जावई, नवरा, सर्वांना मिळो.” त्यामुळे आता सर्वजण अधिपतीच्या वागण्यावर फारच खुश झाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Netizens praise tula shikvin changlach dhada fame adhipati for his understanding nature rnv

First published on: 05-10-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×