Bigg Boss Marathi 5 Updates: ‘बिग बॉस मराठी ५’ सुरू होऊन एक आठवडा झाला आहे. या शोच्या पहिल्याच आठवड्यात घरात बरेच प्रसंग घडले. निक्की तांबोळी व वर्षा उसगांवकरांची भांडणं झाली, जान्हवी किल्लेकर व आर्या जाधव यांच्यातही वाद झाल्याचं पाहायला मिळालं. एकाच आठवड्यात निक्की तांबोळीने अनेकदा वर्षा उसगांवकरांचा अपमान केला. आता होस्ट रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) निक्कीची चांगलीच शाळा घेतली आहे. हा प्रोमो आल्यानंतर नेटकऱ्यांनी केलेल्या कमेंट्स चर्चेत आहेत.

“बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलण्याचं भान नाही, त्याला इथे स्थान नाही”, असं म्हणत रितेश देशमुखने ‘बिग बॉस मराठी’तील पहिल्याच ‘भाऊच्या धक्क्यावर’ निक्की तांबोळीचा समाचार घेतला. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनचा पहिला आठवडा निक्की तांबोळीने चांगलाच गाजवला. निक्कीने बोलताना अनेकदा मर्यादा ओलांडली व सदस्यांचा अपमान केला.

Video: “हात खाली, आता मी बोलतोय”, रितेश देशमुखने घेतला निक्कीचा समाचार; म्हणाला, “मराठी माणसाचा अपमान…”

ती भाषा मी खपवून घेणार नाही – रितेश देशमुख

निक्की तांबोळीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात अभिनेत्री वर्षा उसगांवकरांचा अपमान केला, त्यावरून रितेश चांगलाच भडकला. रितेश देशमुख निक्कीला म्हणाला,”वर्षां ताईंसोबत ज्या भाषेत तुम्ही बोलतात ती भाषा मी खपवून घेणार नाही.. त्यांचं कतृत्व, काम याचा आदर झालाच पाहिजे. तुमचा उद्धटपणा महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात आणि प्रत्येक मराठी माणसापर्यंत पोहोचला आहे. कारण तुम्ही थेट मराठी माणसाच्या मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करुन त्या मराठी माणसाचा अपमान केलाय.”

इन्स्टाग्रामवर व्हायरल होणाऱ्या ‘चिन टपाक डम डम’चा अर्थ काय? तो ऑडिओ कुठून आला? जाणून घ्या

रितेश पुढे म्हणाला,”‘बिग बॉस मराठी’च्या घरात ज्याला बोलायचं भान नाही..त्याला इथे स्थान नाही. महाराष्ट्र ठरवणार कोण घरात आणि कोण घराबाहेर जाणार? ‘बिग बॉस मराठी’च्या ट्रॉफीवर तुमचं नाव कोरलं जाणार की नाही हेदेखील मराठी माणसंचं ठरवणार”. हा प्रोमो पाहिल्यावर नेटकऱ्यांनी रितेशचं कौतुक केलं आहे.

‘एक नंबर… हेच बघायचं होतं अख्ख्या महाराष्ट्राला…’, ‘आता सगळ्यांचा माज उतरणार’, ‘मराठी लोकांचा छावा फक्त आणि फक्त रितेश सर’, ‘रितेश सरांनी सिद्ध केलं की मराठी माणसांबद्दल वाईट बोललेलं सहन केलं जाणार नाही,’ ‘रितेश भाऊ. अगदी बरोबर बोलतात. काहींना वाटतं आपण खुप जास्त काम केली किंवा खुप मोठे सेलिब्रेटी झालो तर कोणाशी कसं पण वागू शकतो. पण ते हे विसरून जातात की आपली सुरवात कशी झाली आहे. काही ना तर आपल्यापेक्षा मोठ्या माणसांचं आदर करणे किंवा त्यांच्याशी कसं बोलावं हे पण कळत नाही. ह्यांना शिकवा सर माणूस लहान असो वा मोठा आदरानेच बोलायचं’ अशा कमेंट्स काहींनी केल्या आहेत.

वयात १४ वर्षांचे अंतर अन् लग्नानंतर ५ वर्षांनी झाले आई-बाबा; सेलिब्रिटी जोडप्याने दाखवले जुळ्या बाळांचे चेहरे, पाहा Photos

netizens praised Riteish Deshmukh 1
प्रोमोवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

‘वाह रितेश भाऊ वाह… हेच अपेक्षित होतं,’ ‘एवढ्या हिंदी चित्रपटात काम करून देखील रितेश सरांना मराठीचा अभिमान आहे. रितेश सर मनापासून सॅल्युट सर,’ ‘वाह…. याला म्हणतात अस्सल मराठी बाणा’, असंही काही युजर्सनी प्रोमो पाहून म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
netizens praised Riteish Deshmukh 2
प्रोमोवरील नेटकऱ्यांच्या कमेंट्स (फोटो – स्क्रीनशॉट)

‘बिग बॉस मराठी’ हा शो दररोज रात्री ९ वाजता कलर्स मराठीवर प्रसारित होतो. तसेच तुम्ही जिओ सिनेमावरही हा शो पाहू शकता.