‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या ९ वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवणारा हा कार्यक्रम आता शेवटच्या टप्प्यात येऊन पोहोचला आहे. या आठवड्यात कार्यक्रमच्या शेवटच्या भागाचे चित्रीकरण होणार आहे. टीआरपीच्या कारणास्तव ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे.

अशातच आता ‘झी मराठी’वर लवकरच नवा कार्यक्रम सुरू होणार आहे. याचे प्रोमो समोर आले आहेत. ‘झी मराठी’च्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर या कार्यक्रमाचे प्रोमो शेअर करण्यात आले आहेत. ‘करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार…लवकरच खेळ सुरू होणार, झी मराठीवर…. ‘असं कॅप्शन लिहीत नव्या कार्यक्रमाचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे.

हेही वाचा – सुकन्या मोनेंनी सांगितले लग्नानंतर संजय यांच्यात झालेले बदल; म्हणाल्या, “खूप…”

हे नवे प्रोमो पाहून नेटकरी अनेक तर्क-वितर्क लावत आहेत. एका नेटकऱ्याने लिहीलं आहे, ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ बंद होणार आहेत. रात्री ९ ते १० मध्ये तीन मालिका डिसेंबर महिन्यात ‘झी मराठी’वर भेटीला येणार आहे. तर दुसऱ्या नेटकरीनं लिहीलं, “आम्ही उत्सुक आहोत. काय आहे?” तसेच तिसऱ्या नेटकऱ्यानं लिहीलं आहे, “‘झी’च्या पुरस्कार सोहळ्याला अमोल कोल्हे उपस्थित होते. तिथेच समजलं की, आता अमोल कोल्हे पुन्हा ‘झी मराठी’वर येणार.” चौथ्या नेटकऱ्यानं ‘रात्री खेळ चाले ४ चालू करा’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. आता ‘झी मराठी’वरील हा नवा कार्यक्रम नक्की काय असणार आहे? हे येत्या काळातच स्पष्ट होईल.

हेही वाचा – प्रकाश राज यांनी कंगना रणौतची उडवली खिल्ली; अभिनेत्रीचा ‘तो’ व्हिडीओ रिट्वीट करत म्हणाले…

हेही वाचा – “आजकाल कोकणी संस्कृती दाखवण्यापेक्षा माज अन्…”, ‘कोकण हार्टेड गर्ल’वर ‘त्या’ व्हिडीओमुळे टीकेचा भडीमार

दरम्यान, ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेत असला तरी पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व भेटीस येऊ शकते. याबाबत अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रम थांबत असला तरीही प्रेक्षकांच्या मनात तो कायमस्वरूपी राहील. गेली नऊ वर्षे एक हजारहून अधिक भागांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन कार्यक्रमाने केले आहे. माझ्यासह संपूर्ण चमूला या कार्यक्रमाने नाव, ओळख, आर्थिक स्थिरता सर्व काही दिले. तूर्तास थांबत आहोत, असे वाहिनीकडून सांगण्यात आले आहे. पुन्हा सात-आठ महिन्यांनी नवे पर्व सुरू होऊ शकते.”