छोट्या पडद्यावर सध्या नव्या मालिकांचं सत्र सुरू आहे. अनेक नव्या मालिका येत आहेत. पण दुसऱ्या बाजूला काही जुन्या मालिका तग धरून आहेत. या मालिकांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. यापैकी एक मालिका म्हणजे ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’

अभिनेता इंद्रनील कामत व अभिनेत्री रसिका वाखरकर यांची प्रमुख भूमिका असलेली ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. ही मालिका घराघरात पोहोचली असून सगळे कलाकार प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. प्रेक्षकवर्ग या सगळ्या कलाकारांवर भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत अर्जुन व सावीवर अनेक संकटे आली. पण त्यांनी त्या प्रत्येक संकटाला मिळून सडेतोड उत्तरं दिली. सावीने प्रत्येक कठीण परिस्थितीत अर्जुनची साथ दिली आहे. अशातच आता या मालिकेने धक्कादायक वळण येणार आहे. खोट्या अर्जुन मागचा मास्टमाईंडचा चेहरा समोर आला आहे.

हेही वाचा – Video: मल्लिका शेरावतसमोर गौरव मोरेला डान्स करत अंघोळ करताना पाहून भडकले नेटकरी, म्हणाले, “लेका लाज काढलीस तू आज…”

नुकताच ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेचा नवीन प्रोमो प्रदर्शित झाला आहे. आतापर्यंतच्या भागात प्रेक्षकांना असे दिसत होते की, भीमासदनात प्रवेश केलेला अर्जुन हा खोटा आहे आणि त्याला घरी आणण्यात विश्वंभर मामाचा हात आहे. पण खरंतर, या खोट्या अर्जुनला पैसे देऊन सावीनेच घरात आणले हे समजले आहे. म्हणजे शत्रूंना त्यांच्याच खेळात मात देणार सावी.

सावीच या सगळ्या प्लॅनची मास्टरमाईंड आहे. हा बनावट अर्जुन कुठे आणि कसा भेटला सावीला? काय असेल त्याला घरात आणण्यामागचा सावीचा प्लॅन? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आता प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळतील.

हेही वाचा – Video: नम्रता संभेरावच्या लेकाचा अन् भाचीचा ‘नाच गं घुमा’ चित्रपटातील गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा – Video: ‘अबीर गुलाल’ नव्या मालिकेत झळकणार ‘बिग बॉस मराठी’चा विजेता! जबरदस्त प्रोमोसह जाहीर केली मालिकेची तारीख अन् वेळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेतील हे वळण पाहून प्रेक्षकांना देखील आश्चर्याचा धक्का बसला आहे. मालिकेच्या प्रोमोवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “दिग्दर्शकाने पूर्ण गेमचं चेंज केला”, “क्या बात है सावी”, “सुपर से उपर ट्विस्ट”, “‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ मालिकेच्या दिग्दर्शकाला सॅल्यूट”, अशा अनेक प्रतिक्रिया या प्रोमोवर प्रेक्षकांच्या उमटल्या आहेत.