Nikki Tamboli Bigg Boss Marathi: निक्की तांबोळी बिग बॉस मराठी ५ मध्ये चांगलीच चर्चेत राहिली. शो संपल्यावर निक्की घरातील तिचे अनुभव सांगत आहे. तिची घरातील स्पर्धकांशी भांडणं, अरबाजबरोबर जवळीक याबाबत ती तिची मतं मांडत आहे. बिग बॉस मराठीच्या ७० दिवसांच्या प्रवासात कोणत्या गोष्टीची खंत आहे का, असं तिला विचारण्यात आलं. त्यावर तिने उत्तर देताना वर्षा उसगांवकरांचं (Varsha Usgaonkar) नाव घेत वक्तव्य केलं.

निक्की तांबोळी म्हणाली, “मला बिग बॉसच्या प्रवासातील कुठल्याच गोष्टीची खंत नाही, फक्त एकाच गोष्टीची आहे ती म्हणजे मी वर्षाताईंशी उद्धटपणे बोलले. पण मी तिथेच गेममधून बाहेर येण्याआधी माफी मागितली आणि त्यांनी मला माफही केलं, त्यामुळे खंत अशी काहीच नाही. ट्रॉफी कोणीही उचलू द्या, माझं काम होतं की मला शो गाजवायचा आहे, ते मी केलं.”

हेही वाचा – Video: बिश्नोई गँगकडून धमक्या अन् बिग बॉस १८चे शूटिंग; सलमान खान स्पष्टच म्हणाला, “कसम खुदा की…”

मराठी कुटुंबात वाढलीस, तुझी आई त्यांची चाहती होती, त्यामुळे खरंच तू वर्षा उसगांवकरांबद्दल ऐकलं नव्हतंस का? असं विचारल्यावर निक्की म्हणाली, “मी खरंच त्यांच्याबद्दल काहीच ऐकलं नव्हतं. यात खोटं बोलण्यासारखं काहीच नाही. मी त्यांना ओळखते असं बोलून सहानुभूती घ्यायची किंवा मी त्यांना ओळखत नाही असं बोलून लोकांचा द्वेष घ्यायचा असा काही मी विचार केला नव्हता. खरं सांगायचं झाल्यास मी घरातील कोणालाच ओळखत नव्हते. अरबाज, जान्हवी, वैभव, पुढारी कुणालाच मी ओळखायचे नाही, माझ्यासाठी घरातील हे नवीन कुटुंब होतं. नंतर हळूहळू सेलिब्रिटी घरात येऊ लागले, ते त्यांच्याबद्दल बोलायचे, कौतुक करायचे नंतर मला अभिजीतने वगैरे सांगितलं की त्या खूप मोठ्या अभिनेत्री आहेत.”

हेही वाचा – सतत मिळणाऱ्या धमक्यांदरम्यान मनातलं बोलला सलमान खान? म्हणाला, “मला बिग बॉसच्या सेटवर…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मी मनापासून माफी मागितली – निक्की तांबोळी

वर्षा उसगांवकरांना तुझी माफी कुठेतरी खोटी वाटते. एखादी गोष्ट करून नंतर माफी मागायची ही तुझी स्ट्रॅटर्जी होती, असं त्या म्हणाल्या होत्या. याबद्दल निक्कीला लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत विचारण्यात आलं. त्याचं उत्तर देताना मी स्पष्टीकरण द्यायला जन्म घेतलेला नाही, नाही असं वक्तव्य तिने केलं. “मी प्रत्येकाला स्पष्टीकरण देण्यासाठी जन्मलेले नाही. किंवा मी किती खरी आहे, किती खोटी आहे हे सांगावं. मी कोणालाही उत्तरदायी नाही, तरी मी मनापासून माफी मागितली आहे आणि मला वाईट वाटलं की मी कलाकार मोठा असो वा छोटा तो कलाकार असतो, त्यामुळे कधी कधी बोलताना मी त्यांचा आदर ठेवला नाही त्याबद्दल मी माफी मागितली आहे. आता वर्षाताईंना ते कितपत खरं वाटतं कितपत नाही वाटत ते त्यांच्यावर आहे. मी त्यांचे पाय धरून सांगू शकत नाही की माझा विश्वास करा, कारण हे व्यक्तीपरत्वे अवलंबून असतं. जर त्यांना वाटतंय की ही माझी स्ट्रॅटर्जी होती तर बाहेर आल्यावर त्यांनी मला फॉलो केलं, माझ्या चाहत्यांनी मला सांगितलं की वर्षाताईंनी तुम्हाला फॉलो केलंय तर प्लीज त्यांना फॉलोबॅक करा. मी घरात त्यांच्याशी वागले त्याची कुठेतरी मनात खंत होती, मी त्यांच्याकडे प्रेरणादायी महिला म्हणून बघते त्यामुळे मी त्यांना फॉलोबॅक केलं,” असं निक्की म्हणाली.