Salman Khan Bigg Boss 18: बाबा सिद्धीकी (Baba Siddique Shot Dead) यांची गेल्या शनिवारी (१२ ऑक्टोबर) रोजी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गँगने त्यांच्या हत्येची जबाबदारी घेतली. त्यानंतर सिद्दीकींचा जवळचा मित्र व अभिनेता सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सलमानला सतत धमक्या मिळत आहेत. असे असूनही त्याने शोचे शूटिंग केले. आजच्या एपिसोडमध्ये ‘वीकेंड का वार’मध्ये होस्ट सलमान खान स्पर्धकांची शाळा घेणार आहे.
बिग बॉसच्या घरात शिल्पा शिरोडकर व अविनाश मिश्रा यांचं भांडण झालं होतं. अविनाशला रेशनची जबाबदारी देण्यात आली आहे. घरातील स्पर्धकांना काहीही बनवायचं असेल तर अविनाशकडून रेशन घ्यावं लागतं. अविनाश फक्त बेसिक रेशन द्यायला तयार असतो तर शिल्पा त्याला नॉन-व्हेज मागते. मात्र तो देण्यास नकार देतो. यानंतर अविनाश शिल्पाला ती सगळं लोकांच्या गूड बूक्समध्ये येण्यासाठी करते असं बोलतो. हे ऐकताच शिल्पाचा राग अनावर होतो आणि त्यांच्यात जोरदार भांडण होतं. याच संदर्भात आजच्या भागात सलमान शिल्पाशी बोलताना दिसणार आहे.
हेही वाचा – सूरज चव्हाण सहानुभूतीमुळे बिग बॉस जिंकला, या टीकेवर निक्की तांबोळी म्हणाली, “मी ट्रॉफी उचलली असती तर…”
कलर्स टीव्हीने ‘वीकेंड का वार’चा नवीन प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये सलमान शिल्पा शिरोडकरशी बोलताना दिसतोय. प्रोमोत शिल्पा रडताना दिसतो, तिला सलमान म्हणतो, “शिल्पा आय हेट टिअर्स रे.. जेव्हा तुझी मुलगी जेवणावर राग काढायची तेव्हा तू तिला काय म्हणायचीस?” शिल्पा म्हणाली, “जेवणावर राग नव्हता, अॅटिट्यूडवर होता.” सलमान तिला समजावत म्हणतो, “मग त्या अॅटिट्यूडवर राग काढ, तुझं या घरात भावनिक नातं असायलाच नको. जसं आज मला वाटतंय की मला सेटवर यायचंच नव्हतं. पण माणसाला काही गोष्टी कराव्याच लागतात.” सलमानचं बोलणं ऐकून शिल्पा हमसून हमसून रडू लागते.
हेही वाचा – ‘झापूक झुपूक’ सूरज चव्हाण अन् गौतमी पाटीलची भेट, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “भावाने मार्केट जाम केलंय”
दरम्यान, शिल्पा शिरोडकरशी बोलताना सलमान त्याला आज या सेटवर यायचंच नव्हतं असं म्हणाला. त्याच्या या वक्तव्याची खूप चर्चा होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमानला सतत धमक्या येत आहेत, अशातच त्याने कडक सुरक्षा बंदोबस्तात या शोचे शूटिंग केले. त्यामुळे त्याने केलेल्या वक्तव्याने लक्ष वेधून घेतले आहे.