‘फू बाई फू’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘चला हवा येऊ द्या’ यांसारख्या कार्यक्रमानंतर आता ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा नवा विनोदी कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. निलेश साबळे, भाऊ कदम आणि ओंकार भोजने विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन महाराष्ट्राला खळखळून हसवणार आहेत. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर हा नवाकोरा विनोदी कार्यक्रम सुरू होतं आहे. या कार्यक्रमाचा पहिला-वहिला प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार आहेत. या कार्यक्रमात भाऊ कदम व ओंकार भोजने व्यतिरिक्त सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण असे अनेक कलाकार झळकणार आहेत. विशेष म्हणजे या कार्यक्रमात महाराष्ट्राचे विनोदाचे बादशहा, अत्यंत संवेदनशील गुणी अभिनेते भरत जाधव आणि चार दशकं सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवणाऱ्या अलका कुबल आठल्ये हे दोन महान कलाकार दर भागामधे सेलिब्रिटी पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला दाद देण्यासाठी लाभणार आहेत.

हेही वाचा – जीवनात भेडसावणाऱ्या समस्या अन्…; ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचं ‘असं’ आहे स्वरुप, निलेश साबळे म्हणाले…

‘कलर्स मराठी’च्या इन्स्टाग्राम पेजवर ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ या नव्या कार्यक्रमाचा पहिला प्रोमो शेअर करण्यात आला आहे. यामध्ये निलेश साबळे, भाऊ कदम व ओंकार भोजने यांचा पहिला लूक पाहायला मिळत आहे.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’च्या पहिल्या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘तुम्हाला कलर्स मराठीवर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत.’ तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘जबरदस्त.’ तसेच तिसऱ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘व्वा…आता मजा येणार’. चौथ्या नेटकऱ्याने लिहिलं आहे, ‘अरे व्वा, एकसाथ तीन एक्के बाजी मारणार पक्के. खूप शुभेच्छा.’

हेही वाचा – इन्स्टाग्रामवरील ‘या’ रीलमुळे मृण्मयी देशपांडेला ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ चित्रपटात मिळाली भूमिका, म्हणाली, “माझ्याबाबतीत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, डॉ. निलेश साबळे यांनी आपल्या बहारदार विनोदाने अवघ्या महाराष्ट्राला हसवले. केवळ महाराष्ट्रातच नाही तर जगभरात त्यांनी त्यांचे चाहते निर्माण केले. मराठी मनोरंजन सृष्टीत त्यांचे अनेक दिवाने आहेतच पण बॉलीवूडमध्येही निलेश साबळे यांनी सगळ्या सुपरस्टार्सना आपल्या विनोदाने जबरदस्त फॅन केले. भाऊ कदम यांनीही आपल्या मिश्किल चेहऱ्याने आणि निखळ विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना आपलेसे केले. तसेच ओंकार भोजनेही आपल्या खास शैलीमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. आता विनोदाचे हे तीन हुकमी एक्के एकत्र येऊन पुन्हा एकदा नव्या जोशात, नव्या जल्लोषात विनोदाची चौफेर आतषबाजी करायला सज्ज झाले आहेत. ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ हा कार्यक्रम २० एप्रिलपासून शनिवार – रविवार रात्री नऊ वाजता प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत आहे.