“हसताय ना…हसायलाच पाहिजे”, असं म्हणत घराघरात पोहोचलेले निवेदक, अभिनेते, दिग्दर्शक निलेश साबळे यांनी ‘चला हवा येऊ द्या’ मधून एक्झिट घेतली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक्झिट घेण्यामागचं कारणही स्पष्ट केलं होतं. तब्येतीच्या कारणास्तव थोडेदिवस मी कार्यक्रमातून बाहेर असेल, असं निलेश साबळे म्हणाले होते. पण या कार्यक्रमानंतर साबळेंचा प्लॅन बी काय आहे? हे समोर आलं आहे.

‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना निलेश साबळे म्हणाले, “‘चला हवा येऊ द्या’ अनेक वर्ष सुरू आहे. खूप लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचा मी भाग होतो, याचा मला प्रचंड अभिमान आहे. प्रेक्षकांनी जे काही प्रेम केलंय, करतायत, करत राहतील, त्या सगळ्या प्रेक्षकांचं मी मनापासून आभार मानतो. ज्यांनी इतकी वर्ष आम्हाला हा कार्यक्रम करू दिला. आमच्या सगळ्याला टीमला इतकं डोक्यावर घेतलं. तर मी मनापासून या सगळ्या प्रेक्षकांचे आभार मानतो. पण काही कारणास्तव या कार्यक्रमाचा भाग नसणार आहे. गेल्या आठवड्यापासून मी यातून एक्झिट झालोय. याच कारण एकमेव होतं, ज्या काही मला नवीन गोष्टी करायच्या होत्या. एक सिनेमाचं काम सुरू आहे. वेबसीरिजचं पण काम चालू आहे. तसंच थोड्या तब्येतीच्या तक्रार वाढल्या आहेत. या कारणास्तव मी यातून बाहेर पडलो.”

हेही वाचा – Video: तितीक्षा तावडे-सिद्धार्थ बोडकेच्या साखरपुड्याचा पहिला व्हिडीओ आला समोर, भगरे गुरुजींच्या लेकीच्या ‘त्या’ कृतीने वेधलं लक्ष

पुढे निलेश साबळे म्हणाले, “प्रेक्षकांना हसवण्याचं काम परमेश्वराने आपल्या सर्वांना शिकवलंय, असं मला वाटत. त्यांनी हे दिलं म्हणूनच आपण लोकांना हसवतोय. तर लोकांना आयुष्यभर हसवतं राहणारच आहे. एका कार्यक्रमातून जरी एक्झिट झाली असली तरी नवीन काहीतरी घेऊन तुमच्यासमोर नक्की येईन. मग सिनेमा असेल, नाटक असेल, यातलं काहीही असू शकतं. डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत. पण ठोस नसल्यामुळे तुमच्याशी शेअर करू शकत नाही. एवढं मात्र निश्चित आहे, जे तुम्ही अनुभवलं होतं, त्याहीपेक्षा वेगळं आणि खास नक्कीच तुमच्यासाठी आणेन.”

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील ‘ही’ अभिनेत्री अनेक वर्षांपासून करते घरगुती व्यवसाय, व्हिडीओ व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या पडद्यावर दिसणार का? या प्रश्नाचं उत्तर देताना साबळे म्हणाले, “निश्चित, त्याचंच काम चालू आहे. लोकांना जी उत्सुकता आहे, ती मी थोडीशी ताणून पण धरेन. माझं पु्न्हा एकदा हेच म्हणणं आहे, ज्या कार्यक्रमाने मला इतक्या सगळ्या गोष्टी दिल्या. हा पहिला असा कार्यक्रम आहे, जो १० वर्ष चालला. याचा वेगळा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे या कार्यक्रमाने ज्या गोष्टी मला दिल्या त्यासाठी आयुष्यभर ऋणी राहिन. कार्यक्रमातील सगळ्या कलाकारांनी जे आजपर्यंत सहकार्य केलं होतं, त्याचंही मनापासून आभार मानतो.”