Actor Vibhu Raghav Death: ‘निशा और उसके कजिन्स’ या मालिकेतील भूमिकेमुळे ओळखला जाणारा टीव्ही अभिनेता विभू राघव यांचे सोमवारी निधन झाले. अभिनेत्याचं खरं नाव वैभव कुमार सिंह राघव होते. विभूने मुंबईत उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्याला चौथ्या टप्प्यातील कर्करोग होता. त्याच्या अकाली निधनाच्या वृत्ताला अभिनेत्री कावेरी प्रियम आणि करण वीर मेहरा यांच्यासह इंडस्ट्रीतील इतर मित्रांनी दुजोरा दिला आहे.

विभू राघव हा टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध चेहरा होता, त्याने ‘निशा और उसके कजिन्स’, ‘सावधान इंडिया’सह अनेक शोमध्ये काम केलं होते. २०२२ मध्ये त्याला कोलन कॅन्सरचं निदान झालं. नंतर, त्याने इन्स्टाग्रामवर या आजाराच्या उपचारादरम्यानचा आपला प्रवास चाहत्यांबरोबर शेअर केला होता. तो त्याच्या फॉलोअर्सना सतत प्रकृतीबद्दल अपडेट्स द्यायचा.

विभू राघववर मुंबईतील नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याच्या मृत्यूच्या काही दिवसाआधी अभिनेत्री सिंपल कौल, अदिती मलिक आणि इतरांनी सोशल मीडियावर त्याच्या उपचारांसाठी आर्थिक मदत मागितली होती. सिंपलने २७ मे रोजी एक भावनिक पोस्ट शेअर केली होती. त्यात तिने लिहिलेलं, ‘सर्वांना नमस्कार! आमचा मित्र विभूबद्दल एक छोटीशी अपडेट, तो फक्त आमचा मित्र व सहकारी नाही, तर आमच्या कुटुंबासारखा आहे. तो गेल्या दोन आठवड्यांपासून नानावटी रुग्णालयात चौथ्या टप्प्यातील कर्करोगाशी झुंज देत आहे.’ या पोस्टनंतर एका आठवड्याने विभूची प्राणज्योत मालवली.

विभूवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, सिंपल कौरने यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे.

विभूच्या निधनानंतर कलाकारांनी केल्या पोस्ट

विभूच्या निधनानंतर सिंपल कौलने इन्स्टाग्राम स्टोरीजमध्ये एक पोस्ट करून श्रद्धांजली वाहिली. ‘माझ्या प्रिय मित्रा तुझी खूप आठवण येईल,’ असं तिने लिहिलंय. तर, करणवीरने ‘भावा खूप लवकर गेलास,’ अशी पोस्ट विभूसाठी केली आहे.

Karanveer mehra on Actor Vibhu Raghav death
कलाकारांच्या पोस्ट (सौजन्य – स्क्रीनशॉट)

विभू राघवची शेवटची पोस्ट

विभू राघवने इन्स्टाग्रामवर शेवटची पोस्ट १२ एप्रिल रोजी केली होती. या व्हिडीओत त्याचा कॅन्सर शरीरात पसरलाय, अशी माहिती त्याने दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, विभूच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर चाहते त्याला सोशल मीडियावर पोस्ट करून श्रद्धांजली वाहत आहेत. कर्करोगामुळे विभूची प्रकृती खूपच खालावली होती व त्याला ओळखणं कठीण झालं होतं.