Sharayu Sonawane : ‘पिंकाचा विजय असो’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली शरयू सोनावणे सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ मालिकेत पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे ‘पिंकाचा विजय’ असो मालिकेतील शरयूने साकारलेली पिंकी गाजली. त्याप्रमाणेच तिची ‘पारू’ मालिकेतील पारू भूमिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अत्यंत साधी, सरळ, सोज्वळ असणाऱ्या पारूने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. अभिनेत्री शरयू सोनावणेने ही भूमिका लीलया पेलली आहे.

सध्या ‘पारू’ मालिकेत लग्नाची धामधूम सुरू आहे. मालिकेत आदित्य-अनुष्काच्या लग्न सोहळा पाहायला मिळत आहे. पण, आदित्य-अनुष्काचं लग्न होणार की आदित्य-पारूचं लग्न होणार, हे पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या लग्नसोहळ्यानिमित्ताने ‘पारू’ मालिकेतील कलाकार खूप चर्चेत आहेत.

नुकताच ‘पारू’ मालिकेतील शरयू सोनावणेने ( Sharayu Sonawane ) ‘कलाकृती मीडिया’ या एंटरनेटमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला. यावेळी तिला विचारलं की, इंडस्ट्रीमधला असा कोण मित्र आहे किंवा मैत्रीण आहे, ज्याच्या लग्नासाठी तू खूप उत्सुक आहेस? तेव्हा शरयू म्हणाली, “आता बऱ्याच जणांचं लग्न झालं आहे, ज्याला मी उपस्थिती लावू शकली नाही. पण आता ‘लक्ष्मी निवास’मधली जानू आहे तिचं खऱ्या आयुष्यात लवकरच लग्न होणार आहे. तिने मला आमंत्रण दिलंय. मला तिच्या लग्नाला जाण्याची खूप इच्छा आहे, पण माहीत नाही. मी तिला प्रॉमिस केलं नाहीये, मी येईन वगैरे म्हणून. पण मी तिच्या लग्नाला जाण्याचा नक्की प्रयत्न करेन.”

View this post on Instagram

A post shared by TellyGappa (@tellygappa_official)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील जानू म्हणजे जान्हवीची भूमिका साकारलेली अभिनेत्री दिव्या पुगावकर लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. अक्षय घरतबरोबर ती लग्न करणार आहे. दिव्या पुगावकराचा होणारा नवरा एक फिटनेस मॉडेल आहे. न्यूट्रिशनिस्ट, प्रोफेशनल फिटनेस ट्रेनर म्हणूनही त्याची ओळख आहे. दिव्या आणि अक्षयची मैत्री फेसबुकवर झाली होती. त्यानंतर काही काळाने दोघांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. आता दोघं संसार थाटण्यासाठी तयार झाले आहेत.