Paaru Fame Actress Sings Song: आषाढी एकादशीनिमित्त अनेक कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा देताना दिसत आहेत. कोणी नृत्याच्या माध्यमातून, कोणी वारीमध्ये सहभागी झालेले फोटो शेअर करत तर कोणी विठ्ठलाप्रति भावना व्यक्त करत शुभेच्छा देताना दिसत आहेत.
मराठी मनोरंजनसृष्ठीतील अनेक कलाकारांनी विविध माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. आता पारू मालिकेतील दोन अभिनेत्रींनी एक गाणे गात आषाढी एकादशीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत.
दामिनीने शेअर केला सावित्री आत्यासह व्हिडीओ
पारू मालिकेतील दामिनी आणि सावित्री आत्या यांनी एकत्रित एक गाणे गायले आहे. त्यांनी रखुमाई हे गाणे गायले आहे. या व्हिडीओमध्ये दोघीही पारंपारिक पेहरावात दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना अभिनेत्रीने रखुमाई अशी कॅप्शन लिहिली आहे.
त्यांच्या या व्हिडीओवर अनेकांनी कौतुक करणाऱ्या कमेंटस केल्या आहेत. मालिकेत प्रीतम या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेता अनुज साळुंखेने वाह अशी कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्यासह चाहत्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत. “सुंदर”, “सावित्री आत्या तुमचा आवाज छान आहे”, “दोघींनी गाणं किती गोड म्हटलं आहे”, “मस्तच”, “वाह! दामिनी आणि सावित्री आत्या”, “खूप छान”, अशा अनेक कमेंट केल्या आहेत.



मालिकेत श्रुतकीर्ती सावंतने दामिनी ही भूमिका तर सावित्री आत्या ही भूमिका प्राजक्ता वाडयेने साकारली आहे. दामिनी ही किर्लोस्करांच्या घरात स्वत:ला, तिच्या म्हणण्याला इतरांनी महत्व द्यावे यासाठी प्रयत्न करताना दिसते. श्रीमंत -गरीब अशा भेद करणारी, पारूला सतत त्रास देण्याचा प्रयत्न करणारी, स्वत:ला हुशार समजणारी दामिनी तिच्या विनोदी संवादामुळे लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे मालिकेतील तिची भूमिका महत्वाची ठरते. ती आदित्य आणि प्रीतमची काकू आहे. घरात पारूला मिळणारे महत्व तिला आवडत नाही.
सावित्री आत्या या पात्राबद्दल बोलायचे तर पारू प्रमाणेच किर्लोस्करांच्या घरात काम करणारी सावित्री आत्या तिच्या प्रेमळ स्वभावाने प्रेक्षकांची मने जिंकते. पारूवर ती आईप्रमाणे प्रेम करते. तिची काळजी घेते. तिला योग्य वेळी चांगला सल्ला देते. तिच्या सुख दुखात तिची भागीदार होते. पारू संकटात असताना तिची मदत करते, त्यामुळे पारूला आई नसली तरी सावित्री आत्या तिला मोठ्या मायेने सांभाळून घेते.
मालिकेत नुकतेच दाखविल्याप्रमाणे, दिशाची पुन्हा एकदा किर्लोस्करांच्या आयुष्यात एन्ट्री झाली आहे. तिने दामिनीचा भाचा परितोषशी लग्न केले आहे. आता ती किर्लोस्करांची सून म्हणून किर्लोस्करांच्या घरात प्रवेश मिळवला आहे. आता ती किर्लोस्करांच्या आयुष्यात पुन्हा कोणती संकटे उभी करणार, मालिकेत पुढे काय होणार, हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.