सध्या मनोरंजन सृष्टीत लग्नाचा माहोल आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली. तर येत्या काही दिवसातही अनेक सेलिब्रेटी लग्न करणार आहेत. सध्या अनेक कलाकारांच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. यामध्ये अभिनेत्री कृष्णा मुखर्जीचाही समावेश आहे. आता तिच्या मेहंदीच्या कार्यक्रमादरम्यानच्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमुळे ती चांगलीच ट्रोल होत आहे.
‘ये हैं मोहब्बते’ या लोकप्रिय मालिकेत कृष्णा मुखर्जी महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली. आता नुकतीच तिला मेहंदी आणि हळद लागली. बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालाबरोबर ती लवकरच विवाहबद्ध होणार आहे. ती तिच्या लग्नापूर्वीचे सर्व समारंभ एन्जॉय करताना दिसत आहे. अशातच कृष्णाचा मेहंदी सोहळ्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे जो पाहून नेटकरी तिच्यावर टीका करू लागले आहेत.
आणखी वाचा : मुकेश व नीता अंबानींनी लेकीच्या जुळ्या मुलांना दिली मोठी भेट, फोटो पाहून तुम्हीही व्हाल थक्क
कृष्णाच्या सासरच्या आणि माहेरच्या मंडळींनी एकत्र येऊन त्यांचा मेहंदी समारंभ साजरा केला. हळदीचे अनेक नातेवाईक मित्रमंडळी उपस्थित होते. या दरम्यानच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कृष्णाच्या हातावर मेहंदी लागताना दिसत आहेत. एकीकडे हाताला मेहंदी लावून घेत असताना दुसरीकडे कृष्णा हुक्का मारताना दिसत आहे. कृष्णा तिच्या हातावर मेहंदी काढून घेत असताना तिला कोणीतरी हुक्का आणून देतं. ती देखील मोठ्या उत्साहात हुक्का ओढताना दिसत आहे.
हेही वाचा : दोन दिवसांत पिंपल घालवायचेत? सुकन्या मोनेंनी सांगितला सोपा घरगुती उपाय, म्हणाल्या…
आता तिचा हा व्हिडीओ समोर येताच ती ट्रोल होऊ लागली आहे. या व्हिडीओवर एका नेटकऱ्याने कमेंट करत राहिलं, “आता हेच बघायचं बाकी होतं.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “बकवास.” आणखी एका नेटकऱ्याने लिहिलं, “खूप वाईट.” त्यामुळे आता कृष्णा चांगलीच ट्रोल होऊ लागली आहे.