Pinga Ga Pori Pinga upcoming twist: ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत पाच मैत्रिणींची मैत्री पाहायला मिळते. कोणत्याही संकटात एकमेकांच्या मदतीला धावून जात या मैत्रिणी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. दरम्यानच्या काळात त्यांच्या मैत्रीत दुरावा आल्याचेदेखील पाहायला मिळाले.
कलर्स मराठी वाहिनीवर प्रदर्शित होणार्या पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत सतत ट्विस्ट येताना दिसतात. मालिकेत दाखविल्याप्रमाणे, मनोजला कॅन्सर झाला आहे, हे काही दिवसांपूर्वी सर्वांना समजले आहे.
घटस्थापनेची पूजा सुरू असताना मनोज अचानक पडतो, त्यामुळे घरात भीतीचे वातावरण तयार होते. वल्लरीला त्याच्या प्रकृतीची काळजी वाटते. ती त्याला दवाखान्यात घेऊन जाते; मात्र डॉक्टर सांगतात की, यावर कोणताही उपचार नाही. फक्त त्याच्या उरलेल्या दिवसांत काळजी घेणेच एकमेव पर्याय आहे.
दुसरीकडे प्रेरणाचे आयुष्यदेखील धोक्यात असल्याचे पाहायला मिळाले. तिला केदार आण्ण्याच्या छळाचा सामना करावा लागत आहे. तेजा वल्लरीकडे प्रेरणाबद्दल काळजी व्यक्त करते. त्यामुळे या संकटातून प्रेरणा कशी बाहेर पडणार, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरणार आहे.
मनोजच्या आजाराचे सत्य वल्लरीसमोर येणार?
मालिकेत आता ट्विस्ट येणार आहे. डॉक्टरांचे हे म्हणणे मात्र वल्लरीला मान्य नाही. दुसऱ्या डॉक्टरचा सल्ला घेऊयात, असे ती मनोजला पटवून देते. मनोजला ती कठीण काळात खंबीरतेने साथ देत असल्याचे पाहायला मिळते. इंदुमतीला मात्र वल्लरीचे हे वागणे पटत नाही.
तसेच, कोणतीही कल्पना न देता, ती बाहेर गेल्याने ती वल्लरीला टोमणा मारते. मनोज मात्र इंदुमतीला योग्य शब्दांत उत्तर देतो. आता दुसऱ्या डॉक्टरकडे गेल्यानंतर काही गोष्टी समोर येतात. त्यामुळे आधीच्या डॉक्टरच्या रिपोर्टस् आणि सल्ल्याबाबत वल्लरीला संशय येतो.
मनोजच्या आजाराचं कारण काय आहे? वल्लरी सत्य शोधू शकणार का? मालिकेत काय घडणार? आलेल्या संकटात त्यांचे नाते टिकणार का? प्रेरणाची संकटातून कशी सुटका होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.