‘पिंकीचा विजय असो’ ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील या मालिकेतून अभिनेता विजय आंदळकर घराघरात पोहोचला. विजय नुकताच बाबा झाला आहे. विजयची पत्नी रुपाली झणकरला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे.

विजयने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत ही गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. “बाप झालो, लक्ष्मी घरी आली रे”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे. या पोस्टला त्याने ‘आई-बाबा’ असं कॅप्शनही दिलं आहे. त्याच्या या पोस्टवर चाहते व कलाकारांनी कमेंट्सचा वर्षाव करत विजय व त्याच्या पत्नीचं अभिनंदन केलं आहे.

हेही वाचा>>Video: ‘Just Married’, लग्नानंतर राखी सावंतच्या रिसेप्शनचा व्हिडीओ समोर

हेही वाचा>> Video: “अपूर्वाने वेड लावलंय का?”, विकास सावंतचा व्हिडीओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

विजयने नोव्हेंबर महिन्यात बाबा होणार असल्याची बातमी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करत दिली होती. पत्नी रुपाली झणकरच्या डोहाळेजेवणाचे फोटो त्याने शेअर केले होते. आता कन्यारत्नाची प्राप्ती झाल्यानंतर तो आनंदी आहे.

हेही वाचा>>भर कार्यक्रमात उर्वशी रौतेलाला प्रेक्षकांनी रिषभ पंतच्या नावाने चिडवलं, अभिनेत्रीने बोलणं थांबवलं अन्…; पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय आंदळकर हा ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत युवराज या भूमिकेत दिसून येत आहे. या मालिकेत विजयने साकारलेल्या युवराज या भूमिकेला विशेष पसंती मिळत आहे. त्याचा रावडीपणा आणि बिनधास्तपणा प्रेक्षकांना आवडत आहे.