अलीकडच्या काळात सोशल मीडियावर एखादं नवीन गाणं ट्रेंड झालं की, सर्वत्र त्या गाण्याची चर्चा रंगते. सामान्य लोकांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत सगळेजण या गाण्यांवर रील्स व्हिडीओ बनवू लागतात. तर, अनेकदा ट्रेडिंग गाणी आणि जुन्या गाण्यांचं मिळून रिमिक्स व्हर्जन तयार केलं जातं. गेल्या काही दिवसांपासून इन्स्टाग्रामवर अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाच्या ‘अंगारों’ गाण्याची एक वेगळीच हवा निर्माण झाली आहे. याच ‘अंगारों गाण्याचं एक रिमिक्स सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल झालं आहे.

नेटकऱ्यांनी जुनं मराठी गाणं “एक लाजरा न्‌ साजरा मुखडा…” आणि ‘पुष्पा २’मधील “अंगारो…” ही दोन गाणी मिळून एक रिमिक्स व्हर्जन तयार केलं आहे. हे रिमिक्स गाणं सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. स्पृहा जोशी, ‘घरोघरी मातीच्या चुली’ फेम रेश्मा शिंदे आणि सुमीत पुसावळे, अधिपती – अक्षरा अशा बऱ्याच कलाकार मंडळींनी या व्हायरल गाण्यावर रील व्हिडीओ बनवले आहेत.

हेही वाचा : आरारा खतरनाक! दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत प्रवीण तरडेंची ‘खलनायक’ म्हणून एन्ट्री; म्हणाले, “अख्ख्या भारतभर मार्केट…”

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ या मालिकेतील मुख्य कलाकार इंद्रनील कामत आणि रसिका वखारकर यांनी या रिमिक्स व्हर्जनवर जबरदस्त डान्स केला आहे. ‘पुष्पा २’च्या गाण्यातील मराठमोळ्या ठसक्यावर अर्जुन-सावीला थिरकताना पाहून नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

रसिका वखारकरने या गाण्यावर डान्स करताना निळ्या रंगाची साडी, डोळ्यावर गॉगल असा लूक केला होता. तर, इंद्रनील कामतने डान्स करताना लाल रंगाचा सदरा घातला आहे. हे दोघांच्याही डान्सचं सहकलाकारांसह त्यांच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अवघ्या काही तासांतच अर्जुन-सावीच्या या जबरदस्त डान्सवर लाखो व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा : शाकाहारी असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या ब्लॉगरवर स्वरा भास्कर भडकली; म्हणाली, “गायींचं दूध चोरून…”

हेही वाचा : सोनाक्षीने लग्न करू नये, असं शत्रुघ्न सिन्हांना वाटायचं; अभिनेत्रीने स्वतः केलेला खुलासा, म्हणाली, “कधीकधी माझी आई…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, यांच्या मालिकेबद्दल सांगायचं झालं, तर अर्जुन-सावीची मुख्य भूमिका असलेली ‘पिरतीचा वनवा उरी पेटला’ ही मालिका घराघरांत लोकप्रिय आहे. यामध्ये इंद्रनील कामतने अर्जुन, तर रसिकाने सावी हे पात्र साकारलं आहे. “एक नंबर…”, “ही लाजरी अन् साजरी जोडी पाहून…आमचा पण जीव भुलतो”, “फ्लॉवर नाही फायर आहेत” अशा प्रतिक्रिया अर्जुन-सावीचा जबरदस्त डान्स पाहून येत आहेत. यामध्ये रसिका अन् इंद्रनीलसह गौरव मालणकर, कांची शिंदे, पूजा, सीमा घोगळे यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.