सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद कायमच चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं. चित्रविचित्र कपड्यांमध्ये उर्फी लक्ष वेधून घेताना दिसते. अतरंगी कपड्यांमधील उर्फीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात. कधी वायर, कधी टॉयलेट पेपर तर कधी फोटोपासून ड्रेस बनवणाऱ्या उर्फीच्या कपड्यांवर अनेकांनी आक्षेपही घेतला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाईंनी उर्फीचं समर्थन केलं आहे. तृप्ती देसाईंनी नुकतीच ‘वाढीव कट्टा’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत उर्फीचा एक व्हिडीओ त्यांना दाखविण्यात आला. या व्हिडीओमध्ये उर्फीने हिरव्या रंगाचा जाळीदार ड्रेस घातला होता. यावर प्रतिक्रिया देत तृप्ती देसाई म्हणाल्या, “उर्फी जावेद ही अभिनेत्री व मॉडेल आहे. संविधानाने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार तिला जसा वेश करायचा आहे, जसे कपडे परिधान करायचे आहेत, तसे ती करू शकते.”

हेही वाचा>> “गौतमी पाटीलला पाठिंबा देणं गरजेचं, कारण…”, तृप्ती देसाईंचं वक्तव्य, म्हणाल्या “ती…”

“उर्फीचे कपडे कोणाला आवडत असतील, तर कोणाला आवडत नसतील. पण म्हणून तिला विरोध करणं चुकीचं आहे. यातून महिलांबद्दलचे विचार, मानसिकता दिसून येते. उर्फीला जे वाटतं ते तिने करावं. मी बिग बॉसच्या घरात असताना माझ्याबरोबर अनेक मॉडेल व अभिनेत्री होत्या. त्यांनीही वेगवेगळे कपडे परिधान केले होते. पण मला जसं वागायचं तसंच मी वागले,” असंही तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या.

हेही वाचा>> Video: अ‍ॅक्शन सीन्सचा थरार, रोमँटिक अंदाज अन्…; सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यावेळी तृप्ती देसाईंनी उर्फीचं समर्थन केलं होतं. उर्फी मुस्लिम धर्मीय असल्याने तिला टार्गेट केलं जात असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या होत्या.