Pooja Birari & Soham Bandekar : आदेश व सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा सोहम बांदेकर गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. सोहम सध्या ‘ठरलं तर मग’ आणि ‘घरोघरी मातीच्या चुली’ या दोन मालिकांचा निर्माता म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. यापूर्वी सोहम ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सुद्धा झळकला होता. काही दिवसांपूर्वी सोहम लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू होत्या.

याशिवाय सोहमची होणारी पत्नी आणि बांदेकरांची सून ‘येड लागलं प्रेमाचं’ फेम अभिनेत्री पूजा बिरारी होणार असल्याच्या चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू होत्या. मात्र, सोहम किंवा पूजा या दोघांनीही याबद्दल कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. पण, सुचित्रा बांदेकर यांनी ‘राजश्री मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत सोहमच्या लग्नाची हिंट दिली होती. अशातच आता पूजा बिरारीच बांदेकरांची सून होणार असल्याचं एका व्हिडीओमुळे स्पष्ट होत आहे; तशा कमेंट्सही नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर केल्या आहेत. हा आरतीचा व्हिडीओ पाहुयात…

दरवर्षी आदेश बांदेकर सोशल मीडियावर त्यांच्या घरच्या बाप्पाच्या आरतीची झलक चाहत्यांना दाखवतात. यंदाही बाप्पाच्या आरतीसाठी सगळे बांदेकर कुटुंबीय एकत्र उपस्थित होते. बांदेकरांच्या या घरगुती बाप्पाच्या आरतीला यावर्षी एक खास व्यक्ती उपस्थित होती ती म्हणजे अभिनेत्री पूजा बिरारी.

आरतीच्या व्हिडीओमध्ये पूजाला पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. सुचित्रा बांदेकर यांच्या बरोबर मागे पूजा बिरारी आरतीसाठी उभी होती. तिला पाहताच नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर असंख्य कमेंट्स केल्या आहेत. “भावी सुनबाई पण आहेत आरतीला… खूप छान गणपती बाप्पा मोरया”, “गणपती बाप्पाबरोबर यंदा भावी सुनबाईंचं सुद्धा दर्शन झालं…सासू-सून एकत्र दृष्ट काढा”, “पूजा बिरारी आणि सोहमची बातमी खरी आहे ती आरतीमध्ये दिसतेय”, अशा प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत.

pooja birari attend bandekar family ganpati aarti
आदेश बांदेकर यांच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

दरम्यान, पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मंजिरी ही प्रमुख भूमिका साकारत आहेत. यापूर्वी ती ‘स्वाभिमान- शोध अस्तित्वाचा’ या मालिकेत झळकली होती. तर, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून सोहम छोट्या पडद्यावर झळकला होता. त्याबरोबरच सोहमने ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे.