आपल्या दमदार अभिनयासह मंत्रमुग्ध आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा अभिनेता म्हणजे समीर परांजपे. ‘गोठ’ आणि ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकांनंतर समीरने आपल्या आवाजाने प्रेक्षकांना वेड लावलं. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘सूर नवा ध्यास नवा – आवाज तरूणाईचा’मध्ये त्याने स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. पण या स्पर्धेतून काही दिवसांनी तो बाहेर झाला. त्यानंतर समीर आता ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.

‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेत समीर परांजपेने तेजस प्रभूची भूमिका उत्कृष्टरित्या साकारली आहे. या मालिकेत त्याच्याबरोबर अभिनेत्री शिवानी सुर्वे पाहायला मिळत आहे. काल, २० नोव्हेंबरला समीरचा वाढदिवस होता. त्याच्या वाढदिवसानिमित्ताने अनेक कलाकारांनी खास सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या होत्या. पण, यामधील ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ मालिकेचे लोकप्रिय दिग्दर्शक चंद्रकांत कणसे यांच्या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

हेही वाचा – “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा नवरोबा…”, ‘अंतरपाट’ मालिकेत झळकलेल्या अभिनेत्रीची पतीसाठी खास पोस्ट, म्हणाली…

चंद्रकांत कणसे यांनी समीर परांजपेचा गणपती बाप्पाबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी सुंदर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमधून चंद्रकांत कणसे यांनी समीरच्या कामाचं भरभरून कौतुक केलं आहे. त्यांनी लिहिलं, “टेलिव्हिजनच्या दुनियेत फक्त डायलॉग बोलून पर डे भरणारे अनेक नट जन्माला आलेत. त्यांना इंडस्ट्रीत कामं ही भरपूर मिळतायत कारण हल्ली गुणवत्ता (quality) नाही तर प्रमाण (quantity) फार महत्वाचं झालीय…अशा या नॉन अ‍ॅक्टर्स ना सोडून काही जण आहेत ज्यांना खरंच अभिनय कळतो, अभिनयाची जाण असते, तो जमतो आणि जमत नसेल तर खूप सारे प्रयत्न करून, लाज लज्जा सोडून, कोणाची ही तमा न बाळगता ती लोकं अभिनयाला हरवून त्याला आपलंस करून घेतात…त्यापैकीच एक उत्तम अभिनेता म्हणजे समीर परांजपे.”

हेही वाचा – मराठी मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात; केळवणाचे फोटो आले समोर

पुढे त्यांनी लिहिलं, “सेटवर आल्यापासून मेकअप होईपर्यंत त्याचं एनर्जीने काम करताना अजिबात कसलीच तक्रार नाही की वेळेचं भान नाही. सगळ्या सहकलाकारांबरोबर मज्जा मस्ती करत (विशेषतः – आभा आणि दिनेश) कोणाबरोबर कसलेच हेवेदावे न ठेवता सेटचं वातावरण हलकं करून उत्तम काम करणारा आमचा समीर आणि त्याचा आज वाढदिवस…नेमका मतदानाच्या दिवशी.”

“समीर तुला भाजपाकडून कमळाच्या सुवासिक शुभेच्छा…शिवसेनेकडून धनुष्य बाणासारख्या ध्येयाचा निशाणा बरोबर साधण्याच्या शुभेच्छा…मनसेकडून आगगाडी सारख्या वेगवान पुढे जाण्याच्या शुभेच्छा…उबाठाकडून मशाली सारख्या ज्वलंत विचारांच्या शुभेच्छा…काँग्रेसच्या हाताकडून आशीर्वादाच्या शुभेच्छा…राष्ट्रवादीकडून घड्याळासारख्या नेहमी वेळ पाळण्याच्या शुभेच्छा…तर माझ्याकडून फक्त मनापासून खूप खूप शुभेच्छा,” अशी सुंदर पोस्ट चंद्रकांत कणसे यांनी समीर परांजपेच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली होती.

हेही वाचा – “गूड बाय यश अरुंधती देशमुख…”; ‘आई कुठे काय करते’ फेम अभिषेक देशमुखने लिहिली भलीमोठी भावुक पोस्ट, म्हणाला, “निरोप घेताना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, चंद्रकांत कणसे यांच्या पोस्टवर अनेकांनी समीर परांजपेला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच चंद्रकांत यांनी लिहिलेल्या सुंदर पोस्टचं कौतुकही केलं जात आहे. शिवाय समीरने प्रतिक्रिया देत त्यांचे आभार मानले आहेत.