मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. आपल्या अभिनयाच्या जोरावर प्राजक्ताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर प्राजक्ता नेहमी सक्रिय असते. निरनिराळे फोटो व व्हिडीओ पोस्ट करीत ती चाहत्यांना अपडेट देत असते. आता नुकतीच प्राजक्ताने सोशल मीडियावर आनंदाची बातमी शेअर केली आहे.
हेही वाचा-
ख्रिसमसनिमित्त प्राजक्ताने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिचे साडीतील अनेक फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करीत तिने लिहिलेय, “… आणि मला ख्रिसमस भेट मिळाली. आज आपण २.१ मिलियनचं इन्स्टा कुटुंब झालो आहोत. तर मग या आनंदात मी २१ च्या ऐवजी आज ‘जागतिक साडी दिन’ साजरा करते. या वर्षी साडी माझ्यासाठी खूप खास राहिली आहे. मग साडी दिवस साजरा न करणं अन्यायकारक राहील नाही का. माझ्यावर कायम प्रेम केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.”
प्राजक्ताची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. अनेक चाहत्यांनी या पोस्टवर कमेंट्स करीत या अभिनेत्रीचे अभिनंदन केले आहे. प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. तिने शेअऱ केलेल्या पोस्टवर चाहत्यांकडून लाइक व कमेंट्सचा वर्षाव होतो. अनेकदा प्राजक्ता तिच्या फोटो शूटमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असते. फोटोबरोबरच तिने दिलेल्या कॅप्शनचीही चांगलीच चर्चा रंगताना दिसते.
प्राजक्ताच्या कामाबाबत बोलायचे झाले, तर ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेच्या माध्यमातून प्राजक्ता प्रसिद्धीझोतात आली. नुकतीच या मालिकेला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. काही महिन्यांपूर्वीच तिचा ‘तीन अडकून सिताराम’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्राजक्ताची रानबाजार हे वेब सीरिजही चांगलीच गाजली होती. सध्या प्राजक्ता टेलिव्हिजनवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे सूत्रसंचालन करीत आहे.