मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्राजक्ता माळी. प्राजक्ताने मराठी चित्रपट, मालिका, वेबसीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे. शिवाय ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमासाठी करत असलेलं सुत्रसंचालनही प्रेक्षकांना खूप आवडतं. प्राजक्ता आता तिच्या चाहत्यांसाठी खास सरप्राईज घेऊन येणार आहे. लवकरच ती याबाबत घोषणा करणार आहे.
दरम्यान प्राजक्ताने सोशल मीडिया अकाऊंटद्वारे एक पोस्ट शेअर केली आहे. नवं काय घेऊन येणार याची पूर्वकल्पना देणारी प्राजक्ताची ही पोस्ट आहे. तिच्या या पोस्टने चाह्त्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती पायात पैंजण घालून पायऱ्या उतरताना दिसत आहे.
प्राजक्ताने व्हिडीओ शेअर करत म्हटलं की, “नक्कीच साखरपुडा अथवा लग्न नाही. त्यासाठी “वाट बघा”. इन्स्टा लाइव्हवर उद्या ५.३० वाजता भेटूया. नक्की या.” प्राजक्ताचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर काहींनी विविध अंदाज वर्तवले आहेत.
आणखी वाचा – “…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला
प्राजक्ता लवकरच तिचा ज्वेलरी ब्रँड लाँच करणार आहे. याबाबत ती उद्या (६ जानेवारी) अधिकृत घोषणा करेल. पण सध्यातरी तिने याबाबत कोणतीच माहिती दिली नाही. तू तुझा ज्वेलरी ब्रँड सुरू करत आहेस, प्राजक्तराज ज्वेलरी ब्रँड सुरू करणार आहेस अशा अनेक कमेंट नेटकऱ्यांनी तिचा व्हिडीओ पाहून केल्या आहेत.