scorecardresearch

प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा पडली प्रेमात; फोटो पोस्ट करत म्हणाली…

ती तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असते.

प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा पडली प्रेमात; फोटो पोस्ट करत म्हणाली…

झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे सध्या प्रार्थना बेहरे चर्चेत आहे. आपल्या कामामधून वेळ काढत सोशल मीडियावरही ती सक्रिय असते. विविध फोटो आणि व्हिडिओ शेअर करत ती मालिकेतील त्यांचे काही बिहाइंड द सीन्स तसंच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या गोष्टी चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकताच तिने एक तिचा फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे.

विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती मालिकेतील त्यांचे काही बिहाइंड द सीन्स तसंच तिच्या आयुष्यात घडणाऱ्या काही महत्त्वाच्या घडामोडी तिच्या चाहत्यांशी शेअर करत असते. आता नुकताच तिने एक तिचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल भाष्य केलं आहे.

आणखी वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

तिने नुकताच ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या शूटिंगदरम्यान काढलेला एक सेल्फी इंस्टाग्रामवर पोस्ट केला. यावेळी तिने पांढऱ्या रंगाचा टॉप परिधान केला असून कानामध्ये रिंग्स घातल्या आहेत. त्याचप्रमाणे ती अमेरिकानो पिताना दिसत आहे.

हा फोटो पोस्ट करताना तिने लिहिलं, “माझं नवं प्रेम ‘आइस्ड अमेरिकानो’…. पण माझं माझ्या हॉट कॉफीवरच जास्त प्रेम आहे. तुम्हाला काय आवडतं ?” तिच्या या फोटोवर तिचे चाहते भरभरून प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा : “हातावरची मेहंदी गेल्यानंतरच…” प्रार्थना बेहरेने सांगितला हनिमूनचा ‘तो’ किस्सा

तिचा सहकलाकार श्रेयस तळपदे यानेही या फोटोवर एक हटके कमेंट केली आहे. त्याने लिहिलं, “मला वाटतं तुझं तुझ्या कॉफीवरच प्रेम आहे. कारण त्या व्यतिरिक्त आम्ही तुला कधीही काहीही खाताना पाहिलेलं नाही…” हे लिहिताना त्याने हसण्याचा इमोजीही टाकला. मला प्रार्थनाची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 13:36 IST

संबंधित बातम्या