मराठी कलाविश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखली जाते. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमुळे ती घराघरात पोहोचली. तिने आतापर्यंत अनेक कलाकरांबरोबर स्क्रीन शेअर केली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत नेहा हे पात्र साकारत आहे. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. त्याच्या ऑनस्क्रीन जोडीचे अनेकजण चाहते आहेत. प्रार्थना बेहरे आणि वैभव तत्ववादी यांच्या जोडीबद्दल विविध चर्चा रंगल्या होत्या. मात्र नुकतंच प्रार्थना बेहरेने यावर मौन सोडत भाष्य केले.

प्रार्थना बेहरे ही नुकतंच बस बाई बस या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी कार्यक्रमातील एका महिलेने तिला लग्नाबद्दलच्या अफवा याबद्दल प्रश्न विचारला. सोशल मीडियावर नेटकरी अनेकदा विविध अफवा पसरवत असतात. एकदा एका नेटकऱ्याने अभिनेत्याने बरोबर तुझं लग्नच लावलं होतं, तो काय किस्सा आहे, असे त्यांनी तिला विचारले. त्यावर बोलताना प्रार्थनाने वैभव तत्ववादीबद्दलचा किस्सा सांगितला.
आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

या प्रश्नावर उत्तर देताना प्रार्थना बेहरे हो असं म्हणाली. “मी आणि वैभव तत्ववादी आमचं लग्न झालं होतं, असा तो किस्सा आहे. मी आणि सोनाली आम्हीच कुठेतरी गेलो होतो आणि त्यावेळी एका काकूंनी काय तुझं तर आता लग्न झालंय ना…? मी चकित होऊन माझं… असं म्हटलं. हो वैभव तत्ववादी ना. तर मी नाही… कोणी सांगितलं, असे विचारले.

त्यावेळी आमचा मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा चित्रपट आला होता. त्याचे प्रमोशन सुरु होतं. त्यावेळी त्यांना वाटलं होतं की आमचं लग्न झालं आहे. अगदी आताही मी नेहा म्हणून जेव्हा कुठेही जाते, जरी तेव्हा अभिला माझ्याबरोबर असला तरी यश (श्रेयस तळपदे) दिसत नाही, असे विचारतात. त्यावेळी अनेकदा असं बोलावसं वाटतं की यश माझा नवरा नाही, तर अभि माझा नवरा आहे. पण ते प्रेक्षक आहेत. त्यामुळे ते जे काही बघतात त्यावरुन ते या गोष्टी रिलेट करतात”, असे प्रार्थना बेहरेने सांगितले.

आणखी वाचा : “हातावरची मेहंदी गेल्यानंतरच…” प्रार्थना बेहरेने सांगितला हनिमूनचा ‘तो’ किस्सा

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मराठीतील कलाविश्वातील प्रसिद्ध जोडी म्हणून अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे यांना ओळखले जाते. त्यांनी कॉफी आणि बरंच काही या चित्रपटात पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली होती. त्यानंतर ते दोघेही ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटात झळकले होते. यानंतर त्यांनी व्हॉट्सअॅप लग्न आणि रेडीमिक्स हे दोन चित्रपट केले. या चार चित्रपटानंतर अद्याप ते दोघेही कोणत्याही चित्रपटात झळकलेले नाहीत.