‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचे शेवटचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. लवकरच या पर्वाचा विजेता घोषित केला जाणार आहे. जसजसा या पर्वाचा ग्रँड फिनाले जवळ येतोय तसतसा हा कार्यक्रम अधिक उत्कंठावर्धक होत आहे. सर्व स्पर्धकांमध्ये बिग बॉसची ट्रॉफी मिळविण्यासाठी चढाओढ पाहायला मिळत असतानाच आता या घरातून प्रसाद जवादेला बाहेर पडावं लागलं आहे.

सध्या ‘बिग बॉस’मध्ये अपूर्वा नेमळेकर, राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, प्रसाद जवादे, अक्षय केळकर, आरोह वेलणकर हे सदस्य उरले आहेत. नुकतंच त्या सदस्यांमध्ये एलिमेनेशन कार्य पार पडले. यात बॉटम ३ मध्ये राखी, अमृता आणि प्रसाद हे स्पर्धक होते. त्यातून आज प्रसाद जवादेची बिग बॉसमधून एग्झिट झाली.

आणखी वाचा : “मला निवडल्याबद्दल…” सखी गोखलेने मानले पती सुव्रत जोशीचे आभार

प्रसादने पहिल्या दिवसापासूनच त्याच्या खेळाने आणि घरातील त्याच्या वागणुकीमुळे सर्वांचण् लक्ष त्याच्याकडे वळवलं होतं. तो इलिमिनेट झाल्याने सर्वच स्पर्धकांना दुःख झालं. आपल्याला घराबाहेर पडावं लागतंय ते ऐकून प्रसादचेही डोळे पाणावले. सगळ्या स्पर्धकांनी भावूक होत प्रसादला निरोप दिला. तर घराबाहेर जाताना प्रसादने सर्व स्पर्धकांची माफी मागून “आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया,” असं म्हणाला.

हेही वाचा : प्रसाद जवादेला अभिनय नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचं होतं करिअर, स्वतःच्या मृत्यूचा उल्लेख करत म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुढील आठवड्यात या पार्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. या आठवड्याच्या मध्यात आणखी एक स्पर्धक घराबाहेर जाणार आहे. तर नुकतंच अपूर्वाला तिकिट टू फिनाले मिळाल्यामुळे बिग बॉस 4ची फायनलिस्ट म्हणून तिचे नाव निश्चित झाले आहे. त्यामुळे आता फिनालेमध्ये पोहोचण्यासाठीराखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर यांच्यात चुरस रंगलेली पाहायला मिळणार आहे.