अभिनेत्री अमृता देशमुख आणि अभिनेता प्रसाद जवादे सध्या चांगलेच चर्चेत आहेत. नुकतीच दोघांनी एकमेकांशी लग्नगाठ बांधली. प्रसाद आणि अमृताच्या लग्नसोहळ्याला अनेक मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. दोघांच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, लग्नाअगोदर प्रसादच्या आई-वडिलांनी त्याला सुखी संसारासाठी काही टिप्स दिल्या आहेत. कोणत्या? चला जाणून घेऊया.
हेही वाचा- लग्नानंतर अमृता देशमुखने नवरा प्रसादकडे ‘ही’ इच्छा केली व्यक्त, म्हणाली, “फक्त तू…”




लग्नसोहळ्यादरम्यान प्रसादच्या आई-वडिलांनी राजश्री मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांना प्रसादला लग्नासाठी काय टिप्स द्याल असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना प्रसादची आई म्हणाली, “माझ्या आत्तापर्यंतच्या ४० वर्षांच्या प्रवासानुसार मी प्रसादला एवढीच टीप देईन की, कोणतेही निर्णय विचारपूर्वक घ्यायचे. दुसरी टीप म्हणजे आता संसाराची मोठी जबाबदारी पडली आहे. संसाराची जबाबदारी अतिशय विचारपूर्वक घ्यावी लागते, त्यामुळे त्याने एवढी काळजी घ्यावी.”
तर प्रसादचे बाबा म्हणाले, “दोघांनी चांगला संसार करावा, प्रसादने शांत राहायला हवं. कोणत्याही गोष्टीवर प्रसादने एकदम रिॲक्ट होऊ नये, त्याने पहिली ती गोष्ट समजून घ्यावी आणि मग रिॲक्ट व्हावे.”
प्रसाद आणि अमृता ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वातून घराघरात पोहचले. बिग बॉसच्या घरात दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. जुलै महिन्यात दोघांनी गुपचूप साखरपुडा करत सगळ्यांना आनंदाचा धक्का दिला होता. साखरपुड्यानंतर सगळेजण प्रसाद आणि अमृताच्या लग्नाची आतुरतेने वाट बघत होते.