‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. पंधरा वर्षांपूर्वी झालेली त्या दोघांची मैत्री आजही कायम आहे. आता त्यांनी या मैत्रीला पुढे नेण्याचा निर्णय घेत प्रेमाची कबुली दिली आहे.

‘सा रे ग म प’नंतरही प्रथमेश आणि मुग्धा यांनी अनेक गाण्याचे कार्यक्रम एकत्र केले आहेत आणि अजूनही करत आहेत. त्या व्यतिरिक्त अनेकदा ते दोघं एकत्र दिसतात. त्यामुळे ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत असा अंदाज त्यांचा चाहत्यांना होता. तर चाहत्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे. प्रथमेश आणि मुग्धा यांनी सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो शेअर करत त्यांचं नातं जाहीर केलं आहे.

आणखी वाचा : गायिका मुग्धा वैशंपायनची ‘सुवर्ण’ कामगिरी, पोस्ट शेअर करत म्हणाली, “सांगताना अत्यंत आनंद होतोय की…”

त्या दोघांनी त्यांचा एक फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करत लिहिलं, “तुम्ही सर्व ज्या बातमीची वाट बघत होतात ती अखेर आम्ही सांगत आहोत. आमचं ठरलंय!” याचबरोबर त्यांनी या पोस्टला एम गॉट मोदक, मोदक गॉट मॉनिटर, फॉरएव्हर, कपल्स गोल्स हे हॅशटॅगही वापरले. त्यांनी सोशल मीडियावर ही पोस्ट शेअर करताच तुफान व्हायरल झाली.

हेही वाचा : … म्हणून प्राजक्ता गायकवाडने अमोल कोल्हेंच्या ‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्यातून घेतली एक्झिट, कारण आलं समोर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्या दोघांनी नात्याची कबुली देणं हा अनेकांसाठी आश्चर्याचा सुखद धक्का होता. आता सर्वत्र त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांबरोबरच कलाक्षेत्रातील मान्यवरांनी कमेंट्स करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.