Prathamesh Laghate-Mugdha Vaishampayan Anniversary: ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या कार्यक्रमामुळे लोकप्रियता मिळविणारे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रथमेश लघाटेने लग्नातील काही सुंदर अनसीन फोटो शेअर केले आहेत.

प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाचा आज पहिला वाढदिवस आहे. दोघांनी २१ डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त प्रथमेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नाच्या दिवशीचे काही फोटो शेअर केले आहेत. ‘चि व चि सौ कां to श्री व सौ! या प्रवासाला एक वर्ष पूर्ण झालं,’ असं कॅप्शन प्रथमेशने त्याच्या पोस्टला दिलं आहे.

हेही वाचा – नाना पाटेकर यांच्या पत्नीला पाहिलंत का? फक्त ७५० रुपयांत केलेलं लग्न; ‘अशी’ झालेली दोघांची पहिली भेट

प्रथमेशच्या पोस्टमध्ये दोघांचे काही कँडिड फोटोदेखील आहेत. दोघांनीही लग्नात मराठमोळा साज केला होता. प्रथमेशने पेशवाई लूक केला होता. तर मुग्धाने हिरव्या काठांची पिवळी नऊवारी नेसली होती. त्याबरोबर मॅचिंग दागिने घातले होते. प्रथमेशने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेल्या पोस्टवर चाहते कमेंट्स करून या दोघांना शुभेच्छा देत आहेत.

पाहा पोस्ट –

“आम्हाला बाळ नको होतं”, मुलीच्या जन्मानंतर राधिका आपटेचं वक्तव्य; म्हणाली, “मी गरोदर आहे हे कळाल्यावर…”

Prathamesh Laghate Mugdha Vaishampayan Anniversary
मुग्धा व प्रथमेश यांना चाहत्यांनी लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.

प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांची जोडी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या शोमध्ये त्यांची पहिली भेट झाली. दोघांना या कार्यक्रमातून लोकप्रियता मिळाली. कार्यक्रम संपल्यावर त्यांची मैत्री कायम राहिली. नंतर मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि या दोघांनी २१ डिसेंबर २०२३ रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला वर्ष पूर्ण झालं आहे.

हेही वाचा – वीकेंडचा प्लॅन नाही? पाहा नेटफ्लिक्सवर ट्रेंडिंग असलेल्या ‘या’ १० वेब सीरिज

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथमेश व मुग्धा गायनाच्या कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी फिरतात. ते त्यांच्या प्रत्येक ट्रिपचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांबरोबर शेअर करतात. नुकतेच ते दोघे ऑस्ट्रेलियाला गेले होते. तेथील त्यांचे फोटो खूप चर्चेत होते.