काही दिवसांपूर्वी गायक प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी एक पोस्ट शेअर करत ते दोघं एकमेकांना डेट करत असल्याचं जाहीर केलं. त्यांनी ही पोस्ट शेअर करताच त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होऊ लागला. त्यांच्या चाहत्यांबरोबरच मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकारांनीही त्यांचं अभिनंदन केलं. तर या पोस्टवर अभिनेत्री स्पृहा जोशीने केलेल्या कमेंटने सर्वांचं लक्ष वेधलं. प्रथमेश तिचा सासरा आहे असा खुलासा या कमेंट्समधून झाला. आता प्रथमेशनेच यावर प्रतिक्रिया दिली आहे.

प्रथमेश आणि मुग्धाच्या या पोस्टवर कमेंट करत स्पृहाने लिहिलं होतं, “वा बुवा…!वेलकम वहिनी.” तर त्यावर गायक अवधूत गुप्ते रिप्लाय देत म्हणाला , “वेलकम! जीजू का नाही?” त्यावर स्पृहा म्हणाली, “अहो सर, ते आधीच सासरे आहेत माझे.” त्यावर प्रथमेश लघाटेची होणारी पत्नी मुग्धा वैशंपायनने लिहिलं, “हो. म्हणजे मला जेव्हा हे कळलं तेव्हा माझंही असंच झालं, की मी सासू!!!! नाहीsss” त्यावर प्रथमेशने रिप्लाय देत लिहिलं, “सासरा आहे मी तिचा.” त्यांच्या या कमेंट्स वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता स्वतः प्रथमेशने त्यांच्यातील नात्याबद्दल खुलासा केला आहे.

आणखी वाचा : स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, दोघांमधील नात्याबद्दल कळल्यावर ‘अशी’ होती मुग्धा वैशंपायनची प्रतिक्रिया

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तो म्हणाला, “हो. ही बातमी खरी आहे. मी खरोखर स्पृहाचा सासरा आहे. स्पृहाचा नवरा वरद माझा पुतण्या आहे आणि वरदचे वडील माझे चुलत भाऊ आहेत. असं आमचं हे गुंतागुंतीचं नातं आहे. त्यामुळे ही बातमी १००% खरी आहे, ही अफवा नाही.”

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर प्रथमेशनेच आता त्याच्या आणि स्पृहाच्या नात्यावर शिक्कामोर्तब केला असल्याने त्यांच्या चाहत्यांच्या मनातले अनेक प्रश्न दूर झाले आहेत. तर आता प्रथमेश आणि मुग्धा लग्न कधी करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.