‘टाईमपास’ फेम अभिनेता प्रथमेश परब येत्या २४ तारखेला विवाहबंधनात अडकणार आहे. सध्या अभिनेत्याच्या लग्नाची सर्वत्र जोरदार चर्चा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. प्रथमेश-क्षितिजाचा साखरपुडा १४ फेब्रुवारीला साखरपुडा थाटामाटात पार पडला होता. आता या जोडप्याच्या लग्नासाठी त्यांचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.

प्रथमेश परब व क्षितिजा घोसाळकर यांचा शाही विवाहसोहळा येत्या २४ तारखेला पार पडणार आहे. हळदी समारंभातील काही खास क्षण प्रथमेशने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्याने हळदी समारंभात प्रचंड धमाल केल्याचं पाहायला मिळत आहे. तर, दुसरीकडे प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर असा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

हेही वाचा : मेहंदी रंगली गं! क्षितिजाच्या हातावर सजली प्रथमेश परबच्या नावाची मेहंदी, सुंदर डिझाइनने वेधलं लक्ष

प्रथमेश व क्षितिजा यांची एकमेकांशी पहिली ओळख सोशल मीडियावर झाल्यामुळे अभिनेता सुरुवातीला होणाऱ्या बायकोला “जेवलीस का?” वगैरे असे प्रश्न विचारायचा. या सगळ्या आठवणी क्षितिजाने मेहंदी सोहळ्यात सांगितल्या आहेत. याशिवाय तिच्या हातावरच्या सुंदर अशा मेहंदीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.

हेही वाचा : शुभमंगल सावधान! रकुल प्रीत सिंग व जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; गोव्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा

प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नासाठी खास ‘प्रतिजा’ (Pratija प्रथमेश + क्षितिजा ) हा हॅशटॅग तयार करण्यात आला आहे. क्षितिजाच्या हातावरील मेहंदीवर प्रेक्षकांना ‘प्रतिजा’ या हॅशटॅगची झलक पाहायला मिळते.

View this post on Instagram

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रथमेश परबच्या हळदी समारंभाला अभिनेता अक्षय केळकर आणि दिग्दर्शक मिलिंद कावडे यांनी खास उपस्थिती लावली होती. दरम्यान, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी त्यांच्या रिलेशनशिपला ३ वर्षे पूर्ण झाली आहेत. अभिनेत्याच्या हळदी समारंभाचे फोटो समोर आल्यावर आता चाहते व मराठी कलाविश्वातून या जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे.