तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका आता रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. सईच्या प्रेमाखातर मुक्ता-सागर लग्न करण्यास तयार झाले आहेत. त्यामुळे मालिकेत सध्या मुक्ता-सागरच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. आज दोघांचा साखरपुडा पार पडणार आहे. त्यानंतर मेहंदी, हळद, सप्तपदी असं समारंभपूर्वक लग्नसोहळा पाहायला मिळणार आहे. पण लग्नानंतर सई मुक्ताला काय नावाने हाक मारणार? याचा खुलासा स्वतः सई म्हणजेच बालकलाकार इरा परवडेने केला आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ ही मालिका काही महिन्यांपूर्वी सुरू झाली असली तरी अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने अटळ स्थान निर्माण केलं आहे. मालिकेतील पात्र प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहेत. मुक्ता, सागर, सई असे गोखले-कोळी कुटुंबातील सर्व सदस्य घराघरात पोहोचले आहेत. या मालिकेने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. आजपासून मुक्ता-सागरचा लग्नसोहळा सुरू होणार आहे. त्यानिमित्ताने मालिकेतील कलाकार विविध एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे बालकलाकार इरा परवडेने ‘अल्ट्रा मराठी बझ’या एंटरटेनमेंट युट्यूब चॅनेलशी संवाद साधला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी सई म्हणजे इराने लग्नात काय-काय धमाल करणार? तसंच मुक्ता अँटीला लग्नानंतर कोणत्या नावाने हाक मारणार? याविषयी सांगितलं. इरा म्हणाली की, “सागर पप्पा आणि मुक्ता अँटीचं लग्न झाल्यानंतर मी मुक्ता अँटीला मुक्ता आई अशी हाक मारणार.”