‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतील नवनवीन ट्विस्टने प्रेक्षकांना चांगलंच खिळवून ठेवलं आहे. गेल्या तीन महिन्यांपासून प्रेक्षक ज्या क्षणांची वाट पाहत होते, तो क्षण सध्या सुरू आहे. मुक्ता-सागरचा लग्नसोहळा पाहायला मिळत आहे. साखरपुडा, मेहंदी समारंभ झाला असून संगीत, केळवण, हळद, सप्तपदी असं समारंभपूर्वक मुक्ता-सागरचं लग्न होणार आहे.

‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत कालपासून मुक्ता-सागरच्या संगीत सोहळ्याला सुरुवात झाली आहे. ‘अबोली’मालिकेतील अबोली आणि ‘लग्नाची बेडी’मधील मधुराणी यांच्या कथ्थक नृत्याने संगीतला सुरुवात झाली. त्यानंतर मुक्ताच्या वडिलांनी ‘दाटून कंठ येतो’ हे गाणं गायलं. ज्यामुळे मुक्ता भावुक झाली. आतापर्यंत या संगीत सोहळ्यात अबोली, मधुराणी आणि ‘मन धागा धागा जोडते नवा’ मालिकेतील आनंदी-सार्थकची एन्ट्री झाली आहे. आज ‘पिंकीचा विजय असो’मधील पिंकी-युवराज एन्ट्री होणार आहे. हे सर्वजण डान्स करताना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा – Video: अक्षय केळकरनंतर अश्विनी कासारला लागलं म्हाडाचं घर, बदलापूर ते मुंबईपर्यंतचा प्रवास सांगत म्हणाली…

तसेच या संगीत सोहळ्यात सागरचे आई-वडील म्हणजेच इंद्रा-जयंत एक सरप्राईज डान्स करणार आहेत. यामुळे संगीत सोहळ्याला अजून रंगत येणार आहे. इंद्रा-जयंत मुक्ताच्या आई-वडिलांसारखा पेहराव करून डान्स करताना पाहायला मिळणार आहे. पण यामुळे मुक्ता-सागरमध्ये पुन्हा वाद होताना दिसणार आहे. आई-वडिलांची नक्कल केल्यामुळे मुक्ता भडकते आणि सागरला याविषयी जाब विचारते. “तुम्ही हे ठरवून, मुद्दाम केलं ना?”, असं मुक्ता सागरला विचारते. तेव्हा सागर म्हणतो, “हे मला माहित नव्हतं.” पण इंद्रा-जयंतच्या या सरप्राईज डान्समुळे सगळ्यांना मज्जा येते.

हेही वाचा – ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील अभिनेत्याने दिली प्रेमाची कबुली, म्हणाला, “गेल्या आठ वर्षांपासून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, लवकरच सावनीसमोर मुक्ता सागरशी लग्न करत असल्याचं सत्य उलगडणार आहे. हे सत्य समजल्यानंतर सावनी आणि हर्षवर्धन सागरचा खरा चेहरा मुक्तासमोर आणण्यासाठी नवा डाव रचताना पाहायला मिळणार आहेत.