Maharashtrachi Hasya Jatra Fame Prithvik Pratap : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमांतून घराघरांत पोहोचलेला लोकप्रिय अभिनेता पृथ्वीक प्रताप नुकताच विवाहबंधनात अडकला. अभिनेत्याने त्याची अनेक वर्षांपासूनची मैत्रीण प्राजक्ता वायकुळसह लग्नगाठ बांधली. या दोघांच्या लग्नाचे सुंदर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

२५ ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावर अचानक लग्नाचे फोटो शेअर पृथ्वीकने सर्वांना सुखद धक्का दिला. “एक नवी सुरुवात व्हावी या ही बंधनाने,साक्षीदार व्हावं मग मोगऱ्याच्या ही सुगंधाने” असं कॅप्शन देत त्याने लग्नाचे फोटो शेअर करत ‘जस्ट मॅरिड’ असं लिहिलं होतं. अभिनेत्याचा लग्नसोहळा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला. या नवीन जोडप्याचा लग्नातील लूक सुद्धा अगदी लक्ष वेधून घेणारा होता. पृथ्वीकने लग्नात पांढरा कुर्ता आणि धोतर नेसलं होतं. तर, त्याची पत्नी प्राजक्ताने लग्नात ऑफ व्हाइट रंगाची साडी नेसली होती. दोघांच्या लग्नाच्या फोटोंवर हास्यजत्रेतील कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा : मराठी अभिनेत्याने ३० व्या वाढदिवशी घेतली नवीन गाडी! नव्या कारचं नाव ठेवलंय खूपच खास, फोटो शेअर करत म्हणाला…

ना अवाढव्य खर्च, मोठं सेलिब्रेशन न करता पृथ्वीकने अतिशय साध्या पद्धतीने लग्न केलं. लग्नाचा सगळा खर्च पृथ्वीक आणि त्याची पत्नी एका सामाजिक कारणासाठी वापरणार आहेत. या जोडप्याने दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेतली आहे. पृथ्वीक या मुलांच्या शिक्षणासाठी खर्चासाठी करणार आहे. अभिनेत्याने हा महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे सध्या सर्व स्तरांतून त्याचं कौतुक करण्यात येत आहे. अशातच आता लग्नसोहळा पार पडल्यावर पृथ्वीक त्याच्या गावी पोहोचला आहे.

‘Native’ असं कॅप्शन देत अभिनेत्याने कराड गावचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. याशिवाय पृथ्वीकने लग्न झाल्यावर देवदर्शन देखील केलं आहे. याचा फोटो विनायक खडके यांनी इन्स्टाग्राम पेजवरून शेअर केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये पृथ्वीकला टॅग देखील केलं आहे. यामध्ये नवीन जोडप्याने देवीचं दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहेत.

हेही वाचा : मिस्टर अँड मिसेस देशमुख पोहोचले इंडोनेशियात! जिनिलीयाने दाखवली बालीमधल्या निसर्गरम्य वातावरणाची झलक, पाहा फोटो…

u

u

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Prithvik Pratap
पृथ्वीक प्रताप इन्स्टाग्राम स्टोरी ( Prithvik Pratap )
Prithvik Pratap
अभिनेता पृथ्वीक प्रताप व त्याची पत्नी ( Prithvik Pratap )

दरम्यान, पृथ्वीक प्रतापच्या ( Prithvik Pratap ) कामाबद्दल सांगायचं, झालं तर हास्यजत्रेव्यतिरित्त त्याने अनेक नाटकांमध्ये कामं केली आहेत. ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटात अभिनेत्याने प्रथमेश परबसह प्रमुख भूमिका साकारली होती. याशिवाय नुकताच पृथ्वीक ‘पोरी तुझ्या नावाचा गो’ या म्युझिक व्हिडीओमध्ये देखील झळकला होता.