अभिनेत्री रागिनी खन्ना ‘राधा की बेटियां कुछ कर दिखाएंगी’ आणि ‘ससुराल गेंदा फूल’ या टीव्ही मालिकांमुळे प्रसिद्ध झाली. ती सुपरस्टार गोविंदाची भाची देखील आहे. परंतु मामा सुपरस्टार असल्याने आपल्या करिअरला फायदा झाला नाही, असं रागिनीला वाटतं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या एका मुलाखतीत, रागिनीने सांगितलं की गोविंदाची मुलं टीना आहुजा आणि यशवर्धन आहुजा कदाचित टीव्हीवर काम करणार नाहीत, पण त्याची भाची असल्याने तिला टेलिव्हिजनला नाही म्हणण्याचा विशेषाधिकार मिळाला नाही. गोविंदा अनेक दशकांपासून हिंदी चित्रपट उद्योगाचा भाग आहे आणि त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

प्रसिद्ध अभिनेत्रीने एअरलाइन कॅप्टनशी केलं लग्न, राजस्थानमध्ये मराठी लूकने वेधलं लक्ष, पाहा Photos

गोविंदाची भाची असणं तिच्यासाठी फायदेशीर आहे का असं विचारलं असता रागिनी म्हणाली, “नाही. ते खूप मोठे स्टार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे मी त्यांची मुलगी नाही. मला नमू आवडते (टीना आहुजा) मला यश (यशवर्धन आहुजा) आवडतो. मी त्यांच्यावर खूप प्रेम करते. आम्ही मित्र आहोत, पण तुम्ही कामावर जाता तेव्हा तुमच्याकडे तसं पाहिलं जात नाही. नमू, यश टेलिव्हिजनवर जातील का? पण रागिनी जाईल. तुम्हाला फरक दिसतोय ना? मला वाटतं की हे बदलावं. टेलिव्हिजन नेहमीच चित्रपटांसाठी एक पायरी का आहे?” असा प्रश्नही तिने उपस्थित केला.

‘महाभारत’ मधील ‘कृष्णा’चे IAS अधिकारी असलेल्या एक्स पत्नीवर गंभीर आरोप, पोलिसांत तक्रार देत म्हणाले…

रागिनीने सांगितलं की तिचे गोविंदाचे कुटुंब आणि मावसभाऊ कृष्णा अभिषेक आणि आरती सिंह यांच्याशी चांगले संबंध आहेत. “आम्ही रेस्टॉरंटमध्ये हँगआउट करत नाही. आम्ही बाहेर जात नाही. मी गेल्या ४ वर्षांपासून चिची मामाला (गोविंदाला) भेटले नव्हते, कारण कोविड होता. पण मी त्यांच्या घरी जाते, मामा व मामींना भेटते, त्यांच्याशी गप्पा मारते. प्रत्येक कार्यक्रमात, प्रत्येक दिवाळीत, वाढदिवसाला त्यांच्याशी बोलते. कृष्णा व आरतीशी भाऊबीज, रक्षाबंधन व दिवाळीत भेट होते. माझे सर्वांशी चांगले संबंध आहेत,” असं रागिनी म्हणाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रागिनीने अनेक रिॲलिटी शोमध्ये स्पर्धक आणि होस्ट म्हणून काम केलं आहे. तिचा शेवटचा शो ‘ससुराल गेंदा फूल’ होता, ज्यामध्ये तिने सुहाना कश्यपची भूमिका केली होती. ‘कॉमेडी नाईट्स लाइव्ह’मध्ये ती शेवटची टीव्हीवर दिसली होती.