ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. राखी सावंतने तिचा बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीबरोबर निकाह केल्याचे बोललं जात आहे. त्यांचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखी सावंतने स्वत: तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. यानंतर आता एका मोठा खुलासा समोर आला आहे. राखी सावंतने आदिलबरोबर लग्न केल्यानंतर तिच्या नावात बदल केला आहे.

राखी सावंतने इन्स्टाग्रामवर लग्नाचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत आदिल आणि राखी यांच्या गळ्यात वरमाळा आणि हातात मॅरेज सर्टिफिकेट घेऊन उभी असल्याचे दिसत आहे. या मॅरेज सर्टिफिकेटमध्ये लग्नाची तारीख २९ मे २०२२ लिहिलेलं दिसत आहे. याचा अर्थ राखी आणि आदिलचा सात महिन्यांपूर्वी निकाह झाला आहे. राखी सावंतचे हे दुसरं लग्न आहे. लग्नानंतर राखीने तिच्या नावात मोठा बदल केला आहे.
आणखी वाचा : “मी बिग बॉसमध्ये असताना तो दुसऱ्या…” राखी सावंतचे आदिलवर गंभीर आरोप

“मी आणि आदिलने लग्न केलं आहे. आमचं सात महिन्यांपूर्वीच लग्न झालंय. आम्ही आधी कोर्टात लग्न केलंय आणि त्यानंतर निकाह केला. आदिलनं मला लग्न लपवून ठेवायला सांगितलं होतं. त्यामुळे मी या लग्नाबद्दल ७ महिने लपवून ठेवलं.

पण आदिलचे दुसऱ्या अभिनेत्रीबरोबर अफेअर सुरु आहे. त्यामुळेच मी माझ्या लग्नाचे गुपित सर्वांसमोर उघडं केलं आहे. मी लग्नानंतर माझे नावही बदलले होते. मी माझे नाव फातिमा असे ठेवले होते”, असे राखी सावंतने म्हटले.

आणखी वाचा : गळ्यात वरमाला, हातात मॅरेज सर्टिफिकेट; नवविवाहित राखी सावंतच्या दुसऱ्या लग्नाचे फोटो पाहिलेत का? 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंतने मुस्लिम निकाह पत्रावर फातिमा असे नाव लिहिले आहे, असेही तिने म्हटले आहे. राखी सावंतच्या या खुलासानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिला तू धर्म बदलला का? असा प्रश्नही विचारला आहे.