हिंदी मनोरंजनसृष्टीत ड्रामा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.काही दिवसांपूर्वी तिच्या आईचे निधन झाले, तर त्यानंतर तिच्या वैवाहिक जीवनात अडचणी सुरू झाल्या. आता त्या सर्व दुःखाला मागे सारून तिने पुन्हा एकदा दिलखुलासपणे आयुष्य जगायला सुरुवात केली आहे.
राखी सावंत तिच्या अतरंगीपणामुळे ओळखले जाते. नेहमीच काही ना काही तरी हटके करत ती सर्वांचं लक्ष तिच्याकडे वेधून घेत असते. यावरून अनेकदा तिला ट्रोलही केलं जातं. तर आता असाच तिचा एक व्हिडीओ पाहून नेटकरी खूप हैराण झाले आहेत.
राखी सावंतने नुकताच सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट पाहिला. या दरम्यानचे तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तिला सलमानच्या या चित्रपटाची इतकी भुरळ पडली की ती चित्रपटगृहात या चित्रपटातील ‘बिल्ली बिल्ली’ गाणं सुरू असताना नाचली. तर मध्यंतरात ती पॉपकॉर्न घेण्यासाठी बाहेर आल्यावर तो पॉपकॉर्नचा टॉप तिने स्वतःच्या डोक्यावर घातला आणि ‘बिल्ली बिल्ली’ हे गाणं गात तिने तिथेच डान्स करायला सुरुवात केली.
तिचा हा व्हिडीओ पाहून नेटकर यांनी अक्षरशः डोक्याला हात लावला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केलं. एकाने लिहिलं, “आदिल खान जेलमध्ये आहे तेच चांगलं आहे. कमीत कमी हिच्यापासून लांब तरी आहे.” तर आणखी एक म्हणाला, “राज कुंद्राची बहीण वाटते आहेस.” आणखी एका नेतकऱ्याने लिहिलं, “याला म्हणतात मानसिक स्थिती बिघडणं.” तर अनेकांनी “हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये भरती करा” असं म्हणत तिच्यावर टीका केली.