अभिनेत्री राखी सावंतचा पती आदिल खानला अटक करण्यात आली आहे. राखीने पतीविरोधात तक्रार केल्यानंतर ओशिवारा पोलीस ठाण्यात आदिलला चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आदिलला अटक झाल्यानंतर त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

राखीने मीडियासमोर येत आदिलचे दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला होता. कुराणवर हात ठेवून आदिलने त्या मुलीला भेटणार नसल्याचं कबूल केल्याचं राखी म्हणाली होती. आता आदिलचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आदिल खान कुराणवर हात ठेवून “राखीला मी वचन देतो की तिचा विश्वासघात करणार नाही. यापुढे मी कोणत्याही मुलीच्या संपर्कात राहणार नाही” असं म्हणताना दिसत आहे.

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाआधी ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

आदिलने कुराणवर हात ठेवून शपथ घेतल्यानंतर राखी त्याला त्या मुलीला ब्लॉक करण्यासही सांगत असल्याचं दिसत आहे. राखीने ब्लॉक करायला सांगताच आदिल कुराणवरुन हात झटकून तिथून निघून गेल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आदिल व राखीचा हा व्हिडीओ वाहिद अली खान यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राखी सावंत व आदिल खानने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर सात महिन्यांनी राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर आदिलने राखीशी लग्न केल्याचं मान्य केलं होतं.