‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रविवारी पार पडला. अक्षय केळकरने अपूर्वा नेमळेकर, किरण माने, अमृता धोंगडे आणि राखी सावंत या स्पर्धकांवर मात करत यंदाचं पर्व जिंकलं. राखी सावंत टॉप ५ स्पर्धकांमध्ये होती. तिने पण तिने ९ लाख रुपये घेत विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. शोमधून बाहेर पडल्यानंतर तिला बॉयफ्रेंड आदिल खान घ्यायला आला होता.

“बाकी ते ठरवतीलचं…” रुचिरा जाधवने केली ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांची पोलखोल

राखी सावंतने बिग बॉसमध्ये टॉप ५ स्पर्धकांमध्ये पोहोचवल्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानले. ती म्हणाली, “मी आता बिग बॉसमधून बाहेर पडले. बिग बॉस मराठीचा ग्रँड फिनाले संपला आहे. खूप मजा आली. खूप चांगला अनुभव होता. मला माझ्या चाहत्यांचे वोट देण्यासाठी आभार मानायचे आहेत. त्यांनी मला भरभरून वोट दिले आणि मी टॉप ५ मध्ये पोहोचले. संपूर्ण महाराष्ट्राचे धन्यवाद,” असं म्हणत तिने सर्वांचे आभार मानले.

“एंड ऑफ द चाप्टर” बिग बॉसच्या ग्रँड फिनालेत गैरहजर असलेल्या रुचिरा जाधवची पोस्ट; रोहितबद्दल म्हणाली…

पुढे ती म्हणाली, “घराबाहेर पडताच मला एक वाईट बातमी मिळाली, ती म्हणजे माझी आई आजारी आणि रुग्णालयात दाखल आहे. आता मी तिला भेटायला जाऊ शकत नाही. माझ्या आईसाठी प्रार्थना करा”, असं तिने सांगितलं. यावेळी राखी भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी राखीने सलमान खान आणि कश्मीरा शाह यांचेही त्यांच्या पाठिंब्यासाठी आभार मानले. राखी सावंत बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून पोहोचली होती. दरम्यान, राखी सावंतच्या आईला कर्करोग असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. चाहते राखीची आई ठीक व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहेत.