मनोरंजन सृष्टीतील ड्रामा क्वीन अशी ओळख असलेली राखी सावंत गेले अनेक दिवस तिच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. राखी दुसऱ्यांदा विवाह बंधनात अडकल्याचं नुकतंच समोर आलं. सात महिन्यांपूर्वी तिने आदिल खानशी निकाह केला. त्यांच्या लग्नावरून बरेच दिवस त्यांच्यावर वादविवाद सुरू होते. त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतरही आदिलने त्यांच्या लग्नाबाबत मौन धरलं होतं. पण अखेर आदिलने त्यांचं लग्न झालं असल्याचं कबुल केलं. अशातच ती गरोदर असल्याच्या चर्चा रंगत होत्या. आता यावर राखीने प्रतिक्रिया दिली आहे.

मे २०२२ मध्ये राखीने आदिलशी लग्नगाठ बांधली. आतापर्यंत ती विवाहबद्ध झाली आहे हे तिने गुलदस्त्यात ठेवलं होतं. पण अचानक त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यांनी लग्न केलं असल्याचं त्यांना उघड करावं लागलं. राखी सावंतने आठवड्याभरापूर्वी त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांचं लग्न झालं असल्याचं सांगितलं होतं. त्यांचं हे लग्न चांगलंच चर्चेत राहिलं आहे. राखीने लग्न केल्याच्या बातमीमुळे सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. तसंच ती गरोदर असल्याचंही बोललं गेलं. पण आता या चर्चांवर राखीने मौन सोडलं आहे.

आणखी वाचा : राखी सावंतचा संसार वाचवण्यासाठी सलमान खानने केली मध्यस्थी, खुलासा करत अभिनेत्री म्हणाली, “त्याने आदिलला…”

सध्या राखी आदिलबरोबर अनेक मुलाखती देत आहे. ‘एएनआय’शी बातचीत करताना तिला याबद्दल विचारण्यात आलं. परंतु यावेळी तिने याबद्दल कोणतंही भाष्य करायला नकार दिला. तिच्या गरोदरपणाबद्दल तिला प्रश्न विचारला गेला असता “नो कमेंट्स” असं उत्तर देत तिने यावर बोलणं टाळलं.

हेही वाचा : राखी सावंतला दुसऱ्याबरोबर रोमान्स करताना पाहून भडकला आदिल खान, प्रकरण गेले मारामारीपर्यंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान २०१९ मध्ये राखीने एनआरआय असलेल्या रितेशशी लग्न केलं होतं. हे दोघं ‘बिग बॉस’मध्येही एकत्र सहभागी झाले होते. या शोदरम्यान त्यांच्यात विविध कारणांनी वाद निर्माण झाला आणि त्यांनी २०२२ मध्ये घटस्फोट घेतला. त्यानंतर २०२२ च्या मे महिन्यात तिने आदिलशी निकाह केला.