बॉलिवूडची ड्रामा क्वीन आणि बिग बॉस फेम राखी सावंत मागच्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. राखीने तिचा पती आदिल खानवर मारहाण आणि फसवणूकीचे धक्कादायक आरोप केले होते. त्यानंतर पोलिसांत तक्रार केल्यानंतर आदिल खानला अटक करण्यात आली. सध्या आदिल खान पोलिस कोठडीत असून त्याच्या विरोधात एका इराणी तरुणीने बलात्काराचा तक्रार केली आहे. अशातच आता राखी सावंतने आदिल खानबाबत आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

राखी सावंतला मारहाण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गुन्ह्याखाली पोलिस कोठडीत असलेला आदिल खान ड्रग्ज घ्यायचा असा खुलासा खुद्द राखीनेच केला आहे. राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात ती आदिल खानबद्दल बोलताना दिसत आहे. तिच्याबरोबर या व्हिडीओमध्ये शर्लिन चोप्राही दिसत आहे. शर्लिन चोप्रा मागच्या काही दिवसांपासून राखी सावंतला पाठिंबा देताना दिसत आहे.

आणखी वाचा- Video: आदिल खानच्या अटकेनंतर गर्लफ्रेंड तनु चंडेल पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर, राखी सावंतबाबत विचारताच म्हणाली…

राखी सावंत म्हणाली, “आदिल खानवर मी प्रेम केलं पण त्याने माझ्याबरोबर खूप गैरवर्तन केलं आहे. तो ड्रग्ज घ्यायचा आणि त्यानंतर त्याने मला मारहाण केली आहे. पोलिसांकडे सर्व पुरावे आहेत. त्याच्याकडे कोणतेतरी पॅकेट्स सापडले आहेत जे घेतल्यानंतर पाच दिवसांपर्यंत त्याचा परिणाम त्या व्यक्तीवर राहतो. मला माहीत नाही की ते नेमकं काय होतं. पण पोलीस याबाबत तपास करत आहेत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राखी सावंतने काही दिवसांपूर्वीच आदिल खानचं तनु चंडेल नामक तरुणीशी अफेअर असल्याचं म्हणत आदिलबरोबरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले होते. याशिवाय तनु चंडेल आदिलपासून गर्भवती असल्याचं काही दिवसांपूर्वी राखीने म्हटलं आहे. राखी सावंतच्या या सर्व आरोपांवर तनु चंडेलने प्रतिक्रिया दिली होती. यावेळी तिने योग्य वेळीच आपण या सर्व गोष्टींबद्दल बोलू असं म्हटलं होतं.