Ram Kapoor Reacts To His Comment On Smriti Irani’s Weight : हिंदी टेलीव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे राम कपूर. राम कपूर अलीकडे कायमच चर्चेत असतो. तो सोशल मीडिया व मुलाखतींमार्फत त्याची मतं स्पष्टपणे व्यक्त करतो. परंतु, यामुळे अनेकदा तो वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचं पाहायला मिळतं. असंच त्याने याआधी स्मृती इराणी यांच्याबद्दल वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागलं होतं. या ट्रोल करणाऱ्यां ट्रोलर्सना अभिनेत्याने स्पष्ट उत्तर दिले आहे.

राम कपूरने ‘ह्युमन्स बॉम्बे’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्मृती इराणी यांच्या वजनाबद्दल वक्तव्य केलं होतं. यामुळे त्याला नेटकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. याबद्दल त्याने स्पष्टीकरण दिलं आहे. ‘फिल्मी बीट’च्या मुलाखतीत राम कपूर म्हणाला, “मला नेमकं काय म्हणायचं आहे, हे स्मृतीला कळलं होतं. मलाही माहित आहे मी काय वक्तव्य केलं होतं. त्यामुळे इतर लोकांची मतं आमच्यासाठी महत्त्वाची नाहीत. जेव्हा तुम्ही खूप मनापासून एखाद्या व्यक्तीबद्दल सकारात्मक वक्तव्य करता, ज्याचं तुमच्याकडे कारण असतं आणि जोपर्यंत त्या व्यक्तीला काही फरक पडत नाही किंवा ती काही बोलत नाही, तोपर्यंत इतर लोक काय बोलतात याला फार महत्त्व नसतं”.

राम कपूर पुढे ट्रोलर्सबद्दल म्हणाला, “सोशल मीडियावर कमेंट करत ट्रोल करणाऱ्या या लोकांना फार महत्त्व नाही दिलं पाहिजे. कारण स्वत:चं आयुष्य जगण्यापेक्षा त्यांचं इतरांच्या आयुष्याकडे जास्त लक्ष असतं. तुमच्याकडे एकच आयुष्य असतं ते तुम्हाला नीट जगता आलं पाहिजे. फक्त वेळ निघून जात नसते तर तुमचं आयुष्यसुद्धा हळू हळू कमी होत असतं. स्वत:चं आयुष्य जगण्यापेक्षा ते कमेंट करत बसतात आणि तुम्ही अशा लोकांना महत्त्व देता? तुमच्यासाठी फक्त तुमच्या जवळच्या माणसांच्या आणि कुटुंबियांच्या प्रतिक्रिया महत्त्वाच्या असल्याला हव्या”.

राम कपूर स्मृती इराणींबद्दल नेमकं काय म्हणालेला?

राम कपूर म्हणाला होता की, “स्मृती इराणी शारीरिकदृष्ट्या माझ्यासारखी होती; पण तरीसुद्धा माझ्यापेक्षा जास्त यशस्वी होती. फरक फक्त एवढाच होता की, तिने खूप लवकर हे क्षेत्र सोडलं. तिला तुम्ही ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’च्या पहिल्या भागात बघा आणि मग शेवटचा भाग बघा तुम्हाला फरक जाणवेल. याबाबत माझं तिच्याबरोबरही बोलणं झालं होतं”.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राम कपूर पुढे म्हणालेला, “‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेत जवळपास ८ वर्षांच्या कालावधीत अनेकदा कथेमध्ये लीप घेतली गेली. आधी स्मृती मालिकेत पत्नीची भूमिका साकारत होती, नंतर ती आई झाली आणि शेवटी तिने मालिकेत आजीची भूमिका साकारली. स्मृतीने मालिकेच्या कथेनुसार स्वत:मध्ये बदल केले. ती अजून खूप यशस्वी झाली असती, पण तिने हे क्षेत्र सोडलं. आता राजकारणातही ती उत्तम काम करत आहे”.