‘बडे अच्छे लगते हैं’ या गाजलेल्या मालिकेतून राम कपूरला प्रचंड लोकप्रियता मिळाली. राम व साक्षी तंवर यांनी या मालिकेत मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मालिकेतील या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली होती. राम मागील २० वर्षांहून जास्त काळापासून अभिनयक्षेत्रात सक्रिय आहे. त्याने टीव्ही, चित्रपट व वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये काम केलं आहे.

राम कपूर त्याच्या मालिका व चित्रपटांमुळे चर्चेत असतो, पण त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. राम कपूर महाराष्ट्राचा जावई आहे. रामच्या पत्नीचं नाव गौतमी कपूर आहे. त्याची पत्नी गौतमी गाडगीळ ही मराठी आहे. तिने आजवर अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केलं आहे. राम व त्याची पत्नी दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती पती व मुलांबरोबरच्या पोस्ट शेअर करत असते. पंजाबी कुटुंबातला राम व मराठमोळ्या गौतमीची लव्ह स्टोरी खूपच खास आहे.

मालिकेच्या सेटवर झालेली गौतमी व राम कपूरची भेट

Ram Kapoor Gautami Gadgil Love Story: गौतमी व राम कपूर यांनी लग्न केलं, तेव्हा चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गौतमी घटस्फोटित होती. तिचं पहिलं लग्न फोटोग्राफर मधुर श्रॉफशी झालं होतं, पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही आणि ते विभक्त झाले. यानंतर गौतमीच्या आयुष्यात राम आला. दोघेही ‘घर एक मंदिर’ या एकाच मालिकेत काम करत होते. या मालिकेत राम कपूर दीर तर गौतमी त्याच्या वहिनीची भूमिकेत होती. ‘घर एक मंदिर’ या मालिकेच्या सेटवरच गौतमी आणि राम यांच्यातील जवळीक वाढली. पुढे ते प्रेमात पडले.

कुटुंबाच्या विरोधामुळे मंदिरात केलं लग्न

राम कपूर व गौतमी यांच्या लग्नाला कुटुंबियांचा विरोध झाला होता. कारण राम कपूर पंजाबी, तर गौतमी मराठी आहे. तिचं माहेरचं नाव गौतमी गाडगीळ आहे. तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. दोघांच्या नात्याबद्दल घरी कळाल्यावर ते नाराज झाले, गौतमी व रामच्या लग्नासाठी ते तयार नव्हते. त्यामुळे या जोडप्याने मंदिरात लग्न केलं होतं. त्यांनी १४ फेब्रुवारी २००३ रोजी लग्न केलं होतं. त्यांना सिया व अक्स ही दोन अपत्ये आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Ram Kapoor Gautami Gadgil Love Story
राम कपूर-गौतमी कपूर व त्यांची मुलं (फोटो – इन्स्टाग्राम)

राम कपूरच्या मालिका व चित्रपट

राम कपूर हे टीव्ही इंडस्ट्रीतील मोठं नाव आहे. त्याचबरोबर त्याने चित्रपट व वेब सीरिजमध्येही काम करून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. ‘लिपस्टिक’, ‘कहता है दिल’, ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या त्याच्या काही गाजलेल्या मालिका आहेत. ‘बडे अच्छे लगते है’ ही त्याची सर्वाधिक लोकप्रिय मालिका होय. त्याने बॉलीवूड चित्रपटही केले आहेत. ‘कुछ ना कहो’, ‘फना’, ‘उडान’, कार्तिक कॉलिंग कार्तिक’, ‘स्टुडंट ऑफ द इयर’, ‘शादी के साइड इफेक्ट्स’, ‘एजंट विनोद’ आणि ‘हमशक्ल’ या सारख्या चित्रपटात राम कपूरने विविध भूमिका साकारल्या.