‘झी मराठी’ वाहिनीवरील नवीन रिअ‍ॅलिटी शो ‘जाऊ बाई गावात’चा आज, ११ फेब्रुवारीला प्रवास संपला आहे. एक अफलातून संकल्पना असलेला हा नवीन रिअ‍ॅलिटी शो ४ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. ३ महिन्यांच्या रोलरकोस्टर राईडनंतर या नवीन रिअ‍ॅलिटी शोला पहिली महाविजेती भेटली आहे. रमशा फारुकी ही ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या वहिल्या पर्वाची महाविजेती ठरली आहे.

‘जाऊ बाई गावात’ या बहुचर्चित शोच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा आज, ११ फेब्रुवारीला पार पडला. या सोहळ्यासाठी खास पाहुणे आदेश बांदेकर, सोनाली कुलकर्णी आणि महेश मांजरेकर उपस्थित राहिले होते. रमशा फारुकी, रसिक ढोबळे, संस्कृती साळुंके, अंकिता मेस्त्री आणि श्रेजा म्हात्रे या टॉप ५ स्पर्धकांमध्ये चुरचीशी स्पर्धा पाहायला मिळाली. पण यामधून रमशा, संस्कृती आणि अंकिता या टॉप-३मध्ये पोहोचल्या. या टॉप-३मधून रमशाने बाजी मारत ‘जाऊ बाई गावात’च्या पहिल्या पर्वाच्या ट्रॉफीवर आपलं नावं कोरलं. रमशाला २० लाखांचा धनादेश आणि ‘जाऊ बाई गावात’ची मानाची ट्रॉफी देण्यात आली.

हेही वाचा – लवकरच ‘स्टार प्रवाह’वर झळकणार दोन नवे सदस्य, ‘या’ लोकप्रिय अभिनेत्याच्या नावाची चर्चा

रमशाने आपला आनंद व्यक्त करत म्हणाली, ” Oh My God! तो क्षण जेव्हा सरांनी माझं नाव घेतलं आणि बोलले की गावाची लाडकी लेक आणि ‘जाऊ बाई गावातच्या’ पहिल्या पर्वातली विजेती आहे ‘रमशा’. तेव्हा मला वाटलं की, मी स्वप्न पाहत आहे. कारण गेले २ महिने मी हा क्षण स्वप्नात पाहत होती. पण जेव्हा गावकऱ्यांचा उत्साह आणि सगळे स्पर्धक मला मिठी मारायला आले तेव्हा वाटलं खरंच मी विजेती झाली आहे. माझ्या मनात तो डायलॉग चालू होता ‘इतनी शिद्दत से इस ट्रॉफी को पाने की कोशिश की है की हर एक गावकरीने इससे मुझे मिलाने की साज़िश की है” खरंच माझ्या आयुष्यातला सर्वात भारी क्षण आहे. मी स्वतःला हेच म्हणाली की, ही फक्त सुरुवात आहे रमशा अजून तुला खूप पुढे जायचं आहे आणि जसं ‘जाऊ बाई गावात’ या शोला १०० टक्के दिले आहे. तसंच पुढे ही द्यायचं आहे, कारण यशासाठी कुठचा ही शॉर्टकट नाही.”

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस’ फेम सोनाली पाटीलच्या सख्ख्या भावाचं झालं लग्न, अभिनेत्री नव्या वहिनीसह पोहोचली जोतिबाच्या दर्शनाला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्या आभाराची यादी खूप मोठी आहे सुरुवात गावकऱ्यांपासून करेन मला त्यांनी प्रेम, माणुसकी, आपली संस्कृती शिकवली. थोडक्यात सुखी कसं राहायचं हे शिकवलं. मी कधी विचारही केला नव्हता की कोणी इतकं आपल्यावर प्रेमही करू शकत. ‘जाऊ बाई गावात’ आणि ‘झी मराठी’च्या पूर्ण टीमचे मनपूर्वक आभार मानायचे आहेत. इतकी सुंदर संधी दिली आणि मला एवढं शिकायला मिळालं आणि प्रेक्षकांचे धन्यवाद त्यांनी मला आपलं मानलं आणि प्रेम दिलं. मी गावाला खूप मिस करणार आहे. मी ठरवलं आहे की मी गावात एक घर घेणार, मी गावाच्या इतकं प्रेमात पडली आहे.”