छोट्या पडद्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. ‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका घराघरांत लोकप्रिय होती. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेत्री अनघा अतुल या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने श्वेता हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. सध्या अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

अनघाच्या घरी सध्या तिच्या भावाची म्हणजेच अखिलेशची लगीनघाई चालू आहे. फेब्रुवारी महिन्यात अखिलेशच्या लग्नाची सुपारी फुटली होती. या फोटोला अनघाने “अखिलेश आणि वैष्णवी तुम्हाला खूप प्रेम” असं कॅप्शन दिलं होतं. आता लवकरच अनघाच्या भावाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. याची खास झलक अभिनेत्रीने इनस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

हेही वाचा : Video: भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाआधीच्या कार्यक्रमांना पारंपरिक पद्धतीत झाली सुरुवात, पाहा व्हिडीओ

मुहूर्त समारंभ व लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर अभिनेत्री व तिचा भाऊ अखिलेश कुटुंबीयांबरोबर एकत्र थिरकताना पाहायला मिळाले. अनघाने तिच्या भावाबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भावाच्या लग्नाच्या तारखेबद्दल अभिनेत्रीने अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु, हळद कुटण्याच्या कार्यक्रमावरून अखिलेश लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : जान्हवी कपूर दरवर्षी तिरुपती मंदिरात का जाते? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “आईच्या निधनानंतर…”

अनघाचा भाऊ अन् कुटुंबीयांबरोबर झिंगाट गाण्यावर डान्स

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पत्रिका चर्चेत, चार दिवस विदेशात क्रूझवर होणार धमाल; अंबानी-मर्चंट कुटुंबातील सदस्य झाले रवाना

हेही वाचा : “लाथ मारली, धमक्या दिल्या”, रेल्वे प्रवास करताना अश्विनी कासारला आला ‘असा’ अनुभव, पोलिसांना टॅग करत म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनघा व अखिलेश ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलं आहेत. दरम्यान, या दोन्ही भावंडांनी मिळून गेल्यावर्षी पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं नवीन हॉटेल चालू केलं आहे. या हॉटेलवर आतापर्यंत असंख्य मराठी कलाकारांनी भेट दिली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनंतर अनघा ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील मालिकेत झळकली होती. यामध्ये अनघाने मनालीची भूमिका साकारली होती. सध्या भावाच्या लग्नामुळे भगरे कुटुंबीयांकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.